टेस्टि बटाटा मटार रस्सा भाजी ढाबा-रेस्टॉरंट स्टाइल करून बघाच
Tasty Spicy Matar-Batata Rassa Bhaji Dhaba Style In Marathi
थंडीचा सीझन आला की आपल्याला बाजारात बरेच ठिकाणी हिरवे ताजे मटार बघयला मिळतात. आपण घरात असेलेतरी परत विकत घेतो. मग घरी आणून त्याचे नानाविध पदार्थ बनवतो. घरात भाजी नसली किंवा कोणी अचानक पाहुणे आले तर आपण मटार बटाटा रस्सा भाजी बनवतो.
मटार बटाटा रस्सा भाजी सर्वाना आवडते. मटार बटाटा रस्सा भाजी आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. त्यातील एक पद्धत ही आहे. आपण ह्या पद्धतीने मटार बटाटा रस्सा भाजी बनवली तर ती अगदी ढाबा स्टाईल बनते म्हणजे अगदी मस्त तरेदार होते. त्याचा रंग, सुगंध व टेस्ट अगदी ढाबा स्टाइल येते.
हिरवे ताजे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत.
मटार बटाटा रस्सा भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण पुरी, पराठा किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे
1/2 वाटी हिरवे ताजे मटार
2 मोठे कांदे (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 मोठा टोमॅटो (मिक्सरमध्ये ब्लेंड करून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
2 टे स्पून बेसन
मीठ चवीने
2 टे स्पून कोथिंबीर
1/2 टी स्पून कसूरी मेथी
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
2 लवंग
1 तुकडा दालचीनी
1 टी स्पून जिरे
7-8 मिरे
1 मसाला वेलची
कृती: प्रथम कांदा बारीक चिरून घ्या, टोमॅटो मिक्सर मधून काढा. आल-लसूण पेस्ट करून घ्या. बटाटे सोलून त्याचे तुकडे करून पाण्यात घालून ठेवा म्हणजे ते काळे पडणार नाही.
एका कुकर मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचीनी, तमालपत्र, जिरे, मिरे व मसाला वेलची घालून 10 सेकंद परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतून झालाकी आल-लसूण घालून परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून 1-2 मिनिट गरम करून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, घालून 2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मह त्यामध्ये बटाटे , मटार व मीठ चवीने घालून 1-2 मिनिट झाल्यावर 1 1/2 कप कोमट पाणी घालून मिक्स करून त्यामध्ये कसूरी मेथी व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून कुकरचे झाकण लाऊन 2 शिट्या काढा.
कुकर उघडल्यावर गरम गरम मटार बटाटा रस्सा चपाती किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.