थंडीमध्ये आपण 14 प्रकारे आपल्या कोरड्या स्कीनची काळजी घेऊ शकतो ते कसे
Winter Skin Care Routine In Marathi
आपल्या स्कीनची काळजी आपण प्रतेक सीझनमध्ये घेतली पाहिजे. पण थंडीच्या सीझनमध्ये आपण विशेष काळजी घेतली पाहिजे कारण की थंडी मध्येच आपल्या स्कीनच्या समस्या होतात.
थंडी मध्ये आपल्या कोरड्या स्कीनची काळजी कशी घ्यायची ह्याच्या विडियोची लिंक पुढे देत आहे: थंडी मध्ये आपल्या कोरड्या स्कीनची काळजी
आपण स्कीनची काळजी घेण्याच्या अगोदर आपण पहिले पाहिजे आपली स्कीन कोणत्या प्रकारची आहे. कारणकी स्कीन ही 4 प्रकारची असते. ऑयली, कोरडी, मिक्सड व नॉर्मल व प्रतेक स्कीनची काळजी जी वेगवेगळ्या प्रकारे घ्यायची असते.
थंडी मध्ये आपल्या स्कीनची काळजी अश्या प्रकारे घ्या:
* थंडीमध्ये आपली स्कीन कोरडी व अगदी बेजान होते. त्यासाठी विटामीन “E” युक्त मॉसचरायझर लावले पाहिजे. चेहरा दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ पाण्यांनी धुवून मॉसचरायझर लावावे.
* थंडीचा सीझन चालू झालकी आपण गरम पाण्यांनी आंघोळ करतो पण अंघोळीचे पाणी जास्त गरम नसावे कारणकी त्यामुळे आपली स्कीन अजून कोरडी होते.
* थंडीच्या सीझनमध्ये साबणाचा वापर कमी करा जर स्कीन कोरडी असेलतर स्क्रब करणे बंद करावे. त्यामुळे स्कीनची छिद्र अजून मोकळी होऊन स्कीन कोरडी होईल. जेव्हा स्कीन ऑईली असते तेव्हा स्क्रब करावे त्यामुळे स्कीन मधील ऑइल कमी होते.
* थंडी मध्ये आपली स्कीन कोमल व चमकदार राहण्यासाठी दही व साखर मिक्स करून चेहऱ्यावर लावावे मग थोडे सुकल्यावर मसाज करून कोमट पाण्यांनी धुवावे.
* उन्हाळा सीझन मध्ये आपण सनस्क्रीन लावतो पण थंडीमध्ये सुद्धा सनस्क्रीन लावायला पाहिजे कारणकी सूर्यकिरण डायरेक्ट आपल्या स्कीनवर येऊन स्कीनला नुकसान करतात. थंडीमध्ये बरेच लोक उन्हात बसतात पण त्यामुळे स्कीन टैनिंग होऊन बेजान होते. ह्या पासून वाचण्यासाठी थंडीमध्ये सुद्धा सनस्क्रीन लावावे.
* थंडीचा सीझन असुदे किंवा गरमीचा भरपूर पाणी पिले पाहिजे आपल्या शरीरातील पाणी कमी होता कामा नये. त्यामुळे आपली स्कीन डेड होत नाही व स्कीन वरील ग्लो नेहमी राहतो.
* स्कीन ला नेहमी कोमल व हेल्दी ठेवायचे असेलतर नारळाचे तेल वापरावे. नारळाचे तेल फक्त केसांसाठी उपयोगी नसून आपल्या शरीराला व चेहऱ्याला आंघोळीच्या अगोदर एक तास मालीश केल्याने आपली शुष्क त्वचा चांगली राहते.
* ग्लिसरीन, लिंबू व 3-4 थेंब गुलाबपाणी मिक्स करून एक काचेच्या बाटलीत भरून ठेवा व रोज झोपण्याच्या अगोदर आपल्या शरीरावर लावा सकाळी उठल्यावर कोमट पाण्यांनी स्नान करा.
* हाताची स्कीन जर जास्तच कोरडी झाली असेलतर लिंबू व साखरचे मिश्रण हातावर लाऊ नये. मध व लिंबू मिक्स करून ग हातावर लाऊन थोडावेळ तसेच ठेऊन कोमट पाण्यांनी धुवावे.
* अंडे व मधचा फेस मास्क पण स्कीन कोमल व हेल्दी ठेवण्यास मदत करतो. त्यासाठी एक अंड्यात थोडेसे मध मिक्स करून ते मिश्रण चेहऱ्यावर, हातावर व मानेवर लावावे दोन तासांनी कोमट पाण्यांनी धुवावे.
* कोणता सुद्धा सीझन असलातरी आपण आपल्या स्कीनची काळजी घेतली पाहिजे. रोज मुबलक पाणी सेवन केले पाहिजे. प्रतेक सीझन प्रमाणे फळ व भाज्या सेवन केल्या पाहिजेत. थंडीमध्ये गाजर, पालक, मेथी, सरसो, लिंबू सेवन केले पाहिजे ज्यूस सेवन केले पाहिजे.
* काही लोकांची स्कीन पहिल्या पासूनच कोरडी असते व थंडी मध्ये मग अजूनच खराब होते. कोरड्या स्कीनसाठी दूध हा विकल्प सर्वात उत्तम आहे. आपण कोणत्यासुद्धा फेसपॅकमध्ये मिक्स करून लाऊ शकतो किंवा नुसते दूध सुद्धा चेहऱ्यावर लाऊण मसाज करू शकतो. चेहऱ्यावर दूध लाऊन एक तासानी कोमट पाण्यांनी धुवावे. असे रोज केल्यास त्याचा काही दिवसांत फायदा होतो.
* आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थंडीमध्ये आपण आपल्या शरीराला स्वेटर किंवा स्कार्फनी गरम ठेवले पाहिजे. पैट्रोलियम जैली, बॉडी बटर लावावे त्यामुळे आपली स्कीन मुलायम राहील व सुरकुत्या येणार नाहीत.
* 2 चमचे मध, 1 चमचा बटर व थोडेसे लिंबू व मध मिक्स करून त्याचा एक पॅक बनवून चेहऱ्यावर, हातावर व मानेवर लावावा मग अर्धा तासानी कोमट पाण्यांनी धुवावे. थंडीमध्ये असे रोज करा त्यामुळे आपली स्कीन कोमल व हेल्दी व गोरी राहते.
Your recipe is always best. We tried it . And it’s test is amazing. Thank you so much for your wonderful recipe’s
Thanks, Ketaki