24 नोव्हेंबर शुक्रवार तुलसी विवाह संपूर्ण माहिती व महत्व
Tulsi Vivah 2023 Sampurn Mahiti V Mahatva In Marathi
हिंदू पंचांग नुसार तुलसी विवाह नेहमी देवउठनी एकादशी दिवशी साजरा करतात. ह्या दिवशी तुलसी माता व शालिग्राम भगवान ह्यांचा विवाह करतात. दरवर्षी कार्तिक मास शुक्ल पक्ष एकादशी ह्या तिथीला साजरा करतात. चला तर मग बघू या तुलसी विवाह चे महत्व व त्याची संपूर्ण माहिती.
हिंदू रिती-रिवाज मध्ये तुलसी विवाह ला विशेष महत्व आहे ह्या दिवशी भगवान विष्णु चे स्वरूप शालिग्राम ह्यांच्या बरोबर तुलसी चा विवाह करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी जी व्यक्ति शुभ मुहूर्तवर विधी पूर्वक तुलसी माताचे विधिपूर्वक विवाह संपन्न करेल त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख शांती येते. त्याच बरोबर सर्व मनोकामना पूर्ण होऊन संतती सुख मिळते.
पंचांग नुसार दरवर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्ष एकादशी ह्या तिथीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात अगदी धुमधडाक्यात तुलसी विवाह केला जातो. त्यानंतर लग्न समारंभ किंवा कोणते सुद्धा मंगल कार्य सुरू होते.
तुलसी विवाह शुभ मुहूर्त:
तुलसी विवाह कार्तिक मास मधील शुल्क पक्ष द्वादशी तिथी ला केला जातो. पंचांग नुसार द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर गुरुवार रात्री 9 वाजून 1 मिनिटांनी सुरू होत असून 24 नोव्हेंबर शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 06 मिनिटांनी संपणार आहे तर ह्या वेळेत जर तुळशी विवाह केला तर आपल्या घरात अपार धन दौलतचे आगमन होते व आपल्या वैवाहिक जीवनात कायम आनंद येतो.
तुलसी विवाह महत्व:
सनातन धर्मामध्ये तुलसी विवाहला खास महत्व आहे. तुळशी माता बरोबर शालिग्राम अवतार भगवान विष्णु ह्याचा विवाह साजरा करतात. असे म्हणतात की जी कोणी व्यक्ति तुळशी विवाह विधिपूर्वक करेल त्यांच्या जीवनात सकारात्मकता येते. तसेच विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. असे म्हणतात की जी कोणी व्यक्ति जीवनात एकदा तरी विधी पूर्वक करेल त्याला कन्या दानाचे फळ मिळेल.
सर्वार्थ सिद्धि बरोबर 3 शुभ योग तुलसी विवाह 2023 ह्या दिवशी येत आहे.
ह्या वर्षी तुळशी विवाह च्या दिवशी 3 शुभ योग येत आहेत. ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग व सिद्धी योग आहे. तुळशी विवाह सर्वार्थ सिद्धी योग मध्ये होईल. तुळशी विवाहच्या दिवशी सकाळी सिद्धी योग 9 वाजून 5 मिनिट पर्यन्त आहे.
तुलसी विवाह पूजा साहित्य:
तुलसी रोप , भगवान विष्णु प्रतिमा, चौकी, उस, मूली, आंवला, बेर, शकरकंद, सिंघाड़ा, सीताफल, पेरू व काही फळ, धूप, दीपक, वस्त्र, फूल व हार, सौभाग्य सामान, सौभाग्य आलंकार, लाल ओढणी, साडी, हळद
तुळशी विवाह पूजा विधी:
• तुळशी विवाह ह्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभीत करतात. त्याच्या पुढे सडा रांगोळी काढतात.
• तुळशी वृंदावनच्या वर उसाचा मंडप बांधतात. तुळशीला हळद-कुंकू लावतात. मग तुळशी पुढे आवळा व चिंच ठेवावे.
• मग कलश तयार करावा. त्यासाठी स्वच्छ कलश घेऊन त्यावर चारी बाजूनी हळद-कुंकूची बोटे लावावी. म्हणजेच हळद कुंकुवाची बोटांनी पाच रेघा उमटाव्या. मग कलशमध्ये पाणी, पाच विडयाची पाने व नारळ ठेवावा.
• तुळशी जवळ समई लावावी व गणपतीची प्रतिमा ठेवून हळद-कुंकू लावून फूल वाहून गणेश पूजन करावे.
• मग शालिग्राम घेऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करून तुळशी वृंदावनच्या जवळ ठेवावे.
• तुळशीला हिरवे वस्त्र, फुलाची वेणी व कापसाचे वस्त्र वाहावे. नंतर तुळशीच्या वर लाल रंगाचे छोटेसे वस्त्र घालावे. तुळशीला पाणी घालून वाटी बांगडी, सौभाग्य अलंकार घालावे.
• मग शंख पूजन करून हळद-कुंकू वाहून फूल अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा.
• तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता, हळद-कुंकू, पान सुपारी, हळकुंड, बदाम, केळी मोसंबी, व नारळ ठेऊन ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडवळ्या बांधाव्या.
• श्री कृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद-कुंकू, अक्षता फुले, हार घालून पूजन करावे. तुळशी वृंदावनला हार घालावा.
• तुळशी वृंदावन समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभीत करावे व श्री कृष्णची प्रतिमा ठेऊन मध्ये अंतर पाट ठेवून मंगल अष्टक म्हणावे. आरती म्हणून प्रसाद म्हणून मिठाई, फराल व बतासे वाटतात।