वास्तु शास्त्र टिप्स: घरात कामधेनू गाय व वासरू ची मूर्ती ठेवण्याचे महत्व व जागा
Vastu Shastra: Significance Of Kamdhenu Cow And Calf Idol In Marathi
वास्तु शास्त्राला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. हिंदू लोक निरनिराळ्या प्राण्यांना देवाच्या रूपात पूजतात. कारण की त्यांच्यामध्ये देवाचा अवतार असतो.
गाय ही हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र मानली जाते. म्हणूनच गाय व वासरू ह्यांची मूर्ती भारतात बऱ्याच लोकांच्या घरी ठेवतात. जर आपल्याला सुद्धा गाय व वासरू ची मूर्ती आपल्या घरात ठेवायची आहे तर त्यासाठी संपूर्ण माहिती आपण करून घेवू या.
वास्तु शास्त्र टिप्स: घरात कामधेनू गाय व वासरू ची मूर्ती ठेवण्याचे महत्व व जागा ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: घरात कामधेनू गाय व वासरू ची मूर्ती ठेवण्याचे महत्व व जागा
वास्तु कामधेनु गाय:
गाय व वासरू हिंदू धर्मात सर्वात पवित्र प्राणी मानला जातो. कामधेनु एक दिव्य गाय आहे तिचे मुळरूप स्वर्गात आहे. ते रूप समुद्र मंथनच्या वेळी समुद्रा मधून प्रकट झाले होते. हिंदू धर्म अनुसार कामधेनु गाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकते. म्हणूनच वास्तु धन व आनंद मिळण्यासाठी घरात कामधेनु ची मूर्ती ठेवण्याची संकल्पना सांगते.
कामधेनु गाय व तिचे वासरू:
वास्तु कामधेनु गाय नेहमी आपल्या वासरा बरोबर दिसते. हिंदू धर्मामध्ये एक गायचे शरीर व एक महिलेचे डोके ह्या रूपात दर्शविले जाते. जिच्या शरीरात बरेच देवता आहेत.
वास्तु कामधेनु गाय च्या विविध अंगांचे महत्व:
वास्तु शास्त्र नुसार कामधेनु च्या सर्व अंगाच्या भागांचे महत्व आहे. त्यासाठी आपण सर्व माहिती करून घेवू या.
* गाईचे चार पाय म्हणजे चार वेद असे प्रतीक असून हिमालयाचे प्रतिनिधित्व करते.
* गाईचे शिंग पवित्र त्रिमूर्तिचे प्रतीक आहे, जिच्या डोक्यावर भगवान ब्रम्हा, मध्य भागी भगवान विष्णु व भगवान शिव आहेत.
* तिच्या डोळ्यात सूर्य व चंद्राचा वास आहे.
* अग्नि, अग्नि देवता व वायु, पवन देवता ह्यांना तिच्या खांद्यावर दाखवले आहे.
* अजून सर्व महत्वपूर्ण देवता कामधेनु च्या भौतिक संरचना मध्ये निवास करतात.
सुरभि – वास्तु कामधेनु गायचे दूसरे नाव:
कामधेनुचे दुसरे नाव सुरभि आहे. ज्याचा अर्थ आहे सुगंध. हिंदू लोक तिची पूजा करतात त्यामुळे त्यांच्या जीवनात समृद्धी व सफलता मिळण्यासाठी आशीर्वाद मागतात. हिंदू लोक गाईला पवित्र मानतात. आपण पहिले असेल गाईच्या बरोबर नेहमी तिचा बछडा असतो.
वास्तु टिप्स गाय व बछडा घरी ठेवण्याची जागा:
* गाय व बछडा चांदीची किंवा सिरामीकची मूर्ती ठेवावी.
* ज्या लोकांना आपले जीवन अगदी धीमे किंवा नीरस वाटत असेल त्यांनी शुक्रवार ह्या दिवशी पूजा घरात कामधेनु गाय ठेवावी.
* व्ययसाय करणाऱ्या व्यक्ति दर सोमवारी खोलीमध्ये दक्षिण-पश्चिम ह्या कोनामध्ये मूर्ती ठेऊन आपली आर्थिक स्थिति ठीक करू शकतात.
* घरात कामधेनु गाय व बछडाची मूर्ती ठेवल्याने वास्तु दोष नाहीसा होतो व सकारात्मक ऊर्जा येते. घरात कामधेनुची मूर्ती ठेवताना ईशान्य दिशेला ठेवावी. जर ईशान्य दिशेला ठेवणे शक्य नसेलतर उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी.
* आपल्या घरात शांती नसेलतर कामधेनुची मूर्ती ठेवून बघा नक्की फरक पडेल.
* घरात किंवा व्यवसायाच्या जागी कामधेनु गाय व बछडाची मूर्ती ठेवल्याने सफलता, समृद्धी व विकास होतो.
कामधेनु गाय वास्तु लाभ:
* कामधेनु व तिचा बछडा ह्यांची एकसाथ पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला प्रमुख देवी लक्ष्मी, सरस्वती, व दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
* कामधेनु सर्व इच्छा पूर्ण करू शकते व आपल्या घरात शांती व समृद्धी आणू शकते.
* कामधेनु आपल्या जीवनातील प्रतेक समस्या दूर करून व्यावसायिक, भौतिक व आध्यात्मिक सफलता देते.
* वास्तु कामधेनु गाय व बछडा ह्यांच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणा करणाऱ्या महिलांसाठी लाभ होते.
कामधेनु गाय व बछडा ह्यांच्या कोणत्या मूर्तीचा उपयोग करावा:
* कामधेनु गाय व बछडा ह्यांची वेगवेगळ्या आकारात मूर्ती व त्यातील सामग्री मिळते. पण आपण प्रतेक सामग्री बद्दल समजून घेतले पाहिजे.
* आपल्याला शक्य असेलतर चांदीची कामधेनु गाय व बछडाची मूर्ती ठेवू शकता. आपल्याला ती पाहिजे त्या आकारात उपलब्ध होऊ शकते. चांदीची कामधेनु गाय व बछडाची मूर्ती ठेवणे सर्वात जास्त लाभदायक मानले जाते. त्याच्या व्यतिरिक्त आपण तांब्याची किंवा पितळी मूर्ती सुद्धा घेवू शकतो.
* पांढऱ्या संगमरवरी कामधेनु गाय व बछडा ची मूर्ती सुद्धा लाभदायक आहे पण त्यावर कोणता सुद्धा डाग नको. त्याचे स्थान म्हणजे घराचे प्रवेश दार अगदी उत्तम आहे.
* मातीची कामधेनु गाय व बछडा ची मूर्ती ठेवताना जरा काळजी घ्या. किंवा चीनी मातीची सुद्धा मूर्ती ठेऊ शकता.
* कामधेनु गाय व बछडाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते फक्त त्याची योग्य दिशेला स्थापना केली पाहिजे ते महत्वाचे आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व सफलता मिळून समृद्धी मिळते.