वास्तु शास्त्र नुसार रात्रीच्या वेळी बाहेर ओले कपडे सुकवणे अशुभ मानतात का?
Vastu Tips: Why You Should Never Hang Clothes out At Night?
वास्तु शास्त्र मध्ये असे बरेच नियम सांगितले आहेत की जे मानवी जीवनावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तु शास्त्र मध्ये घरात ठेवण्यात येणाऱ्या वस्तु त्यांच्या दिशा बद्दल सुद्धा सांगितले आहे. तसेच काही गोष्टी अश्या आहेत की त्याचा परिणाम डायरेक्ट घरतातील सदस्यांच्या जीवनावर होतो व त्याचा परिणामांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामधील एक गोष्ट म्हणजे कपडे धुणे व सुकवणे. तुम्ही म्हणताल कपड्याचा काय संबंध पण त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या:
रात्री कपडे का धुवू नये?
वास्तु शास्त्रमध्ये असे सांगितले आहे की रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये कारण की रात्रीच्या वेळी वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते व ती आपल्या ओल्या कपड्यामद्धे प्रवेश करते. जेव्हा आपण ते कपडे परिधान करतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा त्या कपड्या मधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. ते आपल्या साठी योग्य नाही.
खर म्हणजे वास्तु शास्त्र नुसार रात्री कपडे धुणे वर्जित आहे. पण वेळे अभवी आपण रात्री कपडे धुतले आहेत तर ते घराच्या बाल्कनी किंवा टेरेस किंवा खिडकीवर वाळत घालू नये कारणकी त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धीमध्ये बाधा येते. तर ते ओले कपडे घरातच वाळत घालावे.
वास्तु शास्त्रमध्ये कपडे धुण्याच्या बद्दल सांगितले आहे की कपडे नेहमी दिवसा धुवून उन्हात सुकवावे कारणकी सूर्याची किरणे कपड्यांवर पडून नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या शरीरावर होतो. पण आपण तरी कपडे धुवून बाहेर वाळत घालतो तर चंद्राची किरणे कपडे सुकवू शकत नाही व कापड्यांमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघत नाही व वाईट कोणती सुद्धा ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते मग आपला त्याच्याशी संपर्क येऊ शकतो.
दुसरे अजून एक कारण असे आहे की उन्हात कपडे सुकवले तर कपड्यामधील किटाणू किंवा हानिकारक जीव मारून जातात. तसेच कपडे लवकर सुकतात. रात्री तसे होत नाही व कपडे सुद्धा लवकर सुकत नाहीत. व आपल्याला काही रोगांचा सामना करावा लागतो.
अजून एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते ती म्हणजे वास्तु शास्त्र नुसार ईशान कोनाचा स्वामी गुरु आहे व ईशान कोन आपल्या संतानाशी संबंधित आहे. म्हणून ह्यादिवशी घरातील कबाड, कोळीष्टक काढणे, फरशी धुणे करू नये त्यामुळे ईशान कोन कमजोर होतो व त्याचा परिमाण आपली संतान व गृह स्वामी वर होतो. व गुरुवारी साबणानी कपडे धुतले तर गुरु कमजोर होतो असे म्हणतात.
तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापणे, नख कापणे, मांस खाणे किंवा दारू पिणे वर्जित आहे. असे केले तर त्याचा उलट परिणाम आपल्यावर होतो. म्हणजेच आपल्या कुंडली मधील गुरु हा ग्रह कमजोर होतो. व त्याचा दोष लागतो.
निष्कर्ष:
आजकाल धकाधकीच्या जीवनात आपल्याला बरीच कामे एकसाथ करावी लागतात कारणकी वेळेच्या अभाव असतो. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला नीट जेवायला किंवा झोपायला सुद्धा वेळ मिळत नाही. व वेळे अभावी आपण आपले कपडे वेळेवर धुवू शकत नाही. म्हणून आपण रात्री कपडे धुतो व ओले लटकलेले कपडे रात्रीच्या वेळी ज्योतिष शास्त्र नुसार अशुभ मानले जाते.
टीप: आम्ही ह्या लेखात अंधविश्वास म्हणून संगत नाही किंवा दिशा भूल करण्यासाठी संगत नाही. आपल्याला पटले तर आपण ह्या गोष्टी आचरणात आणू शकता. आपल्याला त्याची योग्य कारण माहिती करून घ्यायची असतील तर आपण ज्योतिषी सल्ला घेऊ शकता.