टिप्स अँड ट्रिक्स: केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी 10 घरगुती सोपे उपाय
10 Easy Home Remedies: How To Get Rid Of Dandruff In Marathi
केसांमध्ये कोंडा झाला तर खूप खाज येते तसेच केसामधील कोंडा कधी कपड्यावर किंवा खांद्यावर पडतो मग आपल्याला ओशाळल्यासारखे वाटते. खास करून काळ्या रंगाचे कपडे घातले असतील तर त्यावर लगेच दिसून येते. आपल्या टाळूवर झालेला कोंडा फंगसच्या मुळे होतो. टाळूवरील कोंडा डेड स्कीन मुळे वाढतो व तो लहान मोठ्या आकाराचा असतो. कंगव्यानी विंचरून सुद्धा निघत नाही. त्यासाठी पुढे काही टिप्स किंवा घरगुती उपाय दिले आहेत.
टिप्स अँड ट्रिक्स: केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी 10 घरगुती सोपे उपाय ह्या विडियोची लिंक पुढे देलेली आहे तेथे पाहू शकता: केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी सोपे उपाय
केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी घरगुती 10 उपाय: 10 Home Remedies For Dandruff Removal
1.सर्व प्रथम 2 चमचे खोबरेल तेलात 2 चमचे लिंबुरस मिक्स करून आपल्या केसाच्या मुळाशी लाऊन 20 मिनिट तसेच ठेवा मग केस स्वच्छ धुवा.
2. दही हे केसातील कोंडावर रामबाण उपाय आहे. आपल्या केसांच्या मुळाशी दही लाऊन एक तास तसेच ठेवावे.
3. केसामधील कोंडा घालवण्यासाठी कडूलिंबाचा उपयोग करू शकतो. त्यासाठी कडूलिंबाच्या पानाचा रस काढून केसांमध्ये 10-15 मिनिट तसेच ठेवून मग केस धुवावे.
4. संत्रेची साल केसांतील कोंडासाठी खूप फायदेमंद आहे. संत्र्याची साल वाटून त्यामध्ये लिंबुरस मिक्स करून केसांच्या मुळाशी लाऊन अर्धातास तसेच ठेवून मग केस धुवावे.
5. ग्रीन टी सुद्धा आपण वापरू शकता. ग्रीन टी केसांना लाऊन मग थोडा वेळांनी केस धुवू शकता. त्यासाठी 2 ग्रीन टी बॅग गरम पाण्यात टाकून मग थंड झाल्यावर केसांच्या मुळाशी लाऊन मग थोडा वेळांनी केस धुवावे.
6. एक केळे घेऊन त्यामध्ये 2 कप एपल साइडर विनेगर मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून 20 मिनिट नंतर केस धुवावे.
7. केसामधील कोंडा घालवण्यासाठी लसूण वाटून सुद्धा लाऊ शकता. लसूण वाटून त्यामध्ये एक चमचा मध् मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून 15 मिनिट झाल्यावर केस धुवावे.
8. एक अंडे घेऊन त्यामध्ये पिवळे योक वेगळे काढून केसांना लावावे मग एक तासांनी केस धुवावे पण असे केल्याने केसांना अंड्याचा वास येवू शकतो.
9. 2 चमचे व्हाईट व्हेनिगर मध्ये एक चमचा पानी मिक्स करून आंघोळ करताना त्याचे केस धुवावे.
10. मेथीचे दाणे केसामधील कोंडा दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे. रात्री मेथीचे दाणे भिजत टाकून सकाळी ते दाणे वाटून त्याची पेस्ट करून त्यामध्ये लिंबुरस मिक्स करून केसांना लावून मग अर्धा तासांनी शांपुनी केस धुवावे.