आरोग्यदायी डिंकाचे लाडू (बिना पाकाचे) बाळंतीण महिला लहान-मोठ्यांसाठी अगदी निराळ्या पद्धतीने
Healthy Dink Ladoo Without Syrup Different Style In Marathi
आता थंडीचा सीझन चालू झाला आहे. आपण थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो कारण की त्यानंतर उन्हाळा हा सीझन चालू होतो मग आपली तब्येत थोडी खालवते. त्यासाठी थंडीच्या देवसात पौष्टिक आहार केला तर उन्हाळयात आपले आरोग्य चांगले राहते.
डिंकाचे लाडू कसे बनवायचे ह्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: डिंकाचे लाडू विडियो
आज आपण डिंकाचे अगदी निराळ्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत. त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ तुपात भाजून वापरणार आहोत. गव्हाचे पीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. फक्त ड्रायफ्रूट वापरुन बनवलेले लाडू थोडे पचायला जड होतात पण त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून बनवले तर त्याची टेस्ट निराळी लागते व ते पचायला सुद्धा हलके होतात. तसेच ह्या लाडू मध्ये खारीक पावडर, सुके खोबरे, डिंक, ड्रायफ्रूट वापरले आहे. तसेच जायफळ घातले आहे त्यामुळे त्याची चव मस्त लागते. तसेच ह्या लाडूची खास बात अशी आहे की लाडू बनवताना
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 20 लाडू बनतात
साहित्य:
1 1/2 कप गव्हाचे पीठ
1 कप पिठीसाखर
3/4 कप तूप
1 वाटी सुके खोबरे (किसून)
1/2 वाटी खारीक खोबरे
1/2 वाटी खारीक पावडर
1/2 वाटी डिंक
1/2 वाटी काजू-बदाम-पिस्ता
1/2 वाटी किसमिस
2 टे स्पून खसखस
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ
कृती:
प्रथम सुके खोबरे किसून घ्या. वेलची पावडर करून घ्या, जायफळ पूड करून घ्या व साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवा.
एक जाड बुडाच्या कढईमध्ये 1 चमचा तूप घालून प्रथम डिंक परतून घ्या. डिंक पूर्ण फुलला पाहिजे डिंक फुलला की थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून बाजूला ठेवा.
मग एक चमचा तुपात सुके कीसलेले खोबरे घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग एक चमचा तुपात खारीक पावडर थोडी गरम करून घ्या. नंतर एक चमचा तुपात ड्रायफ्रूट भाजून घ्या. मग मिक्सर मध्ये जाडसर ग्राइंड करा.
आता कढई मध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. गव्हाच्या पिठाचा छान खमंग असा सुगंध आला पाहिजे.
एक मोठ्या आकाराचे पसरट भांडे घेऊन त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घेऊन थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये भाजलेले सुके खोबरे, खारीक पावडर, डिंक, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, जायफळ, ड्रायफ्रूट व पिठीसाखर घालून चांगले मिक्स करा.
आता सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यावर त्यातील निम्मे मिश्रण बाजूला करून त्यामध्ये पातळ केलेले तूप थोडे घाला व परत चांगले मळून त्याचे छोटे छोटे लाडू वळा, मग बाकीचे मिश्रण घेऊन त्यामध्ये तूप घालून चांगले मळून लाडू वळा अश्या प्रकारे सर्व लाडू वळून घ्या. नंतर स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.