हेल्दी स्वादिष्ट ब्रोकोलीची भाजी अगदी निराळ्या पद्धतीने कशी बनवायची
Healthy Swadisht Broccoli Chi Bhaji For Kids Tiffin Recipe In Marathi
ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.
ब्रोकोलीच्या सेवनाचे बरेच फायदे आहेत. ब्रोकोली हृदय रोगासाठी गुणकारी आहे, कॅन्सर होण्यापासून बचाव, आपला मूड चांगला राहतो, रोग प्रतिकार शक्ति वाढते, गर्भावस्थामध्ये खूप फायदेशीर, वजन कमी करण्यास मदत होते.
ब्रोकली पासून आपल्या शरीराची पचन शक्ति वाढते, डायबीटीससाठी उपयोगी, स्कीनसाठी उपयोगी, केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची ह्याची विडियोची लिंक पुढे दिलेली आहे: ब्रोकोलीची भाजी
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप ब्रोकोलीचे तुरे
1 मध्यम आकाराचा बटाटा
1 मध्यम आकाराचा कांदा
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून गरम मसाला
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
मीठ चवीने
कृती: प्रथम ब्रोकोलीचे तुरे कापून घ्या. मग एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये ब्रोकोलीचे तुरे अर्धा तास भिजवून ठेवा. म्हणजे ब्रोकोली मधील काही किडे असतील तर निघून जातील. मग परत एकदोन वेळा स्वच्छ पाण्यांनी धुवून बाजूला ठेवा. बटाटा सोलून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवा. टोमॅटो धुवून चिरून बाजूला ठेवा. कांदा उभा पातळ चिरून घ्या. आल-लसूणची पेस्ट करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून कांदा व आल-लसूण पेस्ट व टोमॅटो परतून घ्या. मग त्यामध्ये हळद व बटाटे घालून 2 मिनिट परतून घ्या. बटाटे अर्धवट शिजलेकी त्यामध्ये ब्रोकोलीचे तुरे घालून हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला व मीठ चवीने घालून मंद विस्तवावर 5 मिनिट भाजी परतून घ्या. पाहिजेतर 2 मिनिट झाकण ठेवा ब्रोकोली शिजण्यासाठी.
ब्रोकोली व बटाटे शिजले की त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घालू शकता जर आवडत असतील तर नाहीतर गरम गरम ब्रोकोलीची भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकता.