केस गळणे, सांधे दुखी, रक्त कमी ह्यावर रामबाण अश्या प्रकारे अळीव लाडू बनवा
Healthy Aliv Ladoo | Garden Cress Seeds Ladoo | How To Make Halim Ladoo
आपण बिना मावा, बिना साखर, बिना पाकचे अगदी 10 मिनिटांत झटपट अळीव लाडू बनवू शकतो.
अळीव त्यालाच हलीम असे म्हणतात. आळीव हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहेत. अळीव हे गरम असतात त्यामुळे थंडीच्या दिवसांत अगदी आवर्जून सेवन करतात. अळीव सेवनाचे अनगिनात फायदे आहेत.
केस गळणे, सांधे दुखी, रक्त कमी ह्यावर रामबाण अश्या प्रकारे अळीव लाडू बनवा ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: अळीव लाडू, हलीम लाडू कसे बनवायचे
केस गळणे, स्कीन व हृदय, मासिक पाळी समस्यावर, बाळंत महिलासाठी, शरीरात रक्त कमी, रोगप्रतिकार शक्ति वाढणे, वजन कमी करण्यासाठी तसेच सांधेदुखीवर रामबाण उपाय म्हणजे थंडीच्या दिवसांत अळीव म्हणजेच हलीम सेवन करणे.
अळीव लाडू बनवताना आपण गूळ वापरला आहे गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. अळीव व गूळ ह्या दोन्हीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तसेच ओला नारळ वापरण्याच्या आयवजी डेसिकेटेड कोकनट वापरला आहे त्यामुळे अश्या प्रकारचे लाडू जास्त दिवस टिकतात.
अळीव हे गरम असतात त्यामुळे थंडीच्या दिवसांत ते सेवन करतात, रोज एक लाडू सेवन केला तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला लवकरच पाहायला मिळतात. अळीव लाडू जास्त प्रमाणात केलेतर आपण ते फ्रीज मध्ये ठेवून सेवन करण्याच्या अगोदर एक तास फ्रीज मधून बाहेर काढून ठेवून मग सेवन करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 20 लाडू बनतात
साहित्य:
50 ग्राम अळीव (Halim, Garden Cress Seeds)
125 ग्राम गूळ
125 ग्राम डेसिकेटेड कोकनट
2 टे स्पून तूप
10-12 काजू, बदाम, पिस्ते
1/4 टी स्पून जायफळ
कृती: प्रथम अळीव एका बाउल मध्ये घेवूण त्यामध्ये ते भिजेल एव्हडे पाणी घालून अर्धा तास बाजूला ठेवा. गूळ चिरून बाजूला ठेवा, जायफळ किसून बाजूला ठेवा. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या.
एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये 1 टे स्पून तूप घालून चिरलेला गूळ घालून मंद विस्तवावर गूळ पातळ करायला ठेवा. मग त्यामध्ये अळीव घालून 2-3 मिनिट मंद विस्तवाववर गरम करून घ्या. मिश्रण थोडे घट्ट व्हायला पाहिजे.
आता मिश्रण थोडे घट्ट झालेकी त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे, एक टे स्पून तूप व जायफळ घालून मिक्स करून 2-3 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. मग विस्तव बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
आता मिश्रण थंड झाल्यावर छान छोटे छोटे लाडू वळवून घ्या. मग डब्यात भरून ठेवा.