1 जानेवारी चमचमीत झणझणीत कांदा-टोमॅटो ग्रेव्ही नवरोबासाठी अगदी नवीन पद्धत इन मराठी
In 10 Minutes Tasty Spicy Kanda-Tomato Bhaji Gravy For New Year Recipe In Marathi
आपणा सर्वाना नवीन वर्षांच्या आर्थिक शुभेछा
आपण रोज भाजी किंवा ग्रेव्ही बनवतो. पण तेच तेच खावून कंटाळा येतो. आज आपण अगदी नवीन पद्धतीने कांदा-टोमॅटो ग्रेव्ही बनवणार आहोत. कांदा-टोमॅटो ग्रेव्ही अगदी मस्त चमचमीत झणझणीत लागते. तसेच खूप टेस्टि लागते व बनवायला अगदी सोपी आहे.
चमचमीत झणझणीत कांदा-टोमॅटो ग्रेव्ही ह्याची video link पुढे दिलेली आहे तेथे आपण पाहू शकता: चमचमीत झणझणीत कांदा-टोमॅटो ग्रेव्ही
आपल्या कडे कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा अश्या प्रकारची कांदा-टोमॅटो ग्रेव्ही बनवा सगळे खूप आवडीने खातील. तसेच घरात कधी भाजी नसेलतर अश्या प्रकारची कांदा-टोमॅटो ग्रेव्ही बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
4 मध्यम आकाराचे टोमॅटो
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
2 टे स्पून तेल
2 टे स्पून फ्रेश क्रीम
2 हिरव्या मिरच्या
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
मसाला करिता:
5-6 लसूण पाकळ्या
1” आले
5-6 मिरे
1” दालचीनी
2 लवंग
1 मसाला वेलची
2 तमालपत्र
5-6 लसूण पाकळ्या
1” आले
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
कृती: प्रथम कांदे सोलून त्याचे मोठे मोठे तुकडे करा. टोमॅटो धुवून मोठे मोठे तुकडे करा.
एका कढई मध्ये 2 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये कांदे 2 मिनिट मोठ्या विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेले टोमॅटो 1 मिनिट परतून घ्या. आता त्यामधील 3/4 कांदे-टोमॅटो बाजूला ठेवा. मग 1/4 कने-टोमॅटो मध्ये आल-लसूण, लवंग, दालचीनी, तमालपत्र, मिरे, मसाला वेलदोडा घालून 1 मिनिट परतून मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
त्याच कढईमध्ये तेल गरम करून जिरे घाला मग वाटलेला मसाला घालून 2 मिनिट परतून घ्या, मग हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून फ्रेश क्रीम घालून मिक्स करा आता 1/2 कप पाणी घालून मसाला थोडा शिजू द्या मग त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेले कांदे-टोमॅटो घालून गरम मसाला व हिरवी मिरची घालून मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिट वाफ येवू द्या.
गरम गरम कांदा-टोमॅटो भाजी पराठा बरोबर सर्व्ह करा.