मार्गशीर्ष महिना 2023 गुरुवार महालक्ष्मी व्रत तारीख माहिती व पूजाविधी
Margashirsha Guruwaar 2023 Mahalakshmi Wrat Sampurn Mahiti in Marathi
मार्गशीष महिना हा पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात लक्ष्मी माताची व विष्णु भगवान ह्यांची पूजा अर्चा करतात. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीष महिन्यात चार गुरुवार लक्ष्मी माताची पूजा करतात. ह्या वर्षी 5 गुरुवार आहेत.
मार्गशीर्ष महिना 2023 गुरुवार महालक्ष्मी व्रत तारीख माहिती व पूजाविधी ह्या विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे: मार्गशीर्ष महिना गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजाकशी करायची संपूर्ण माहिती
पहिल्या गुरुवार पासून सुरवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात उद्यापन करताना कुमारिका व महिलाना घरी बोलवून हळद कुंकू, फळ व मार्गशीष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेचे पुस्तक देतात. गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. चारी गुरुवार पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा कहाणी आइकून गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवून उपवास सोडवा. आपल्याला पाहिजे असल्यास पूर्ण वर्ष हे व्रत करू शकता.
The Margashirsha Mahina 2023 Guruwar Mahalakshmi Vrat Tarikh Mahiti Puja Vidhi can be seen on our YouTube Channel Margashirsha Mahina 2023
मार्गशीष महिना ह्या वर्षी 13 डिसेंबर 2023 बुधवार ह्या दिवशी सुरू होत असून 11 जानेवरी 2023 अमावस्या आहे. मग पौष महिना चालू होत आहे.
पहिला गुरुवार 14 डिसेंबर 2023
दूसरा गुरुवार 21 डिसेंबर 2023
तिसरा गुरुवार 28 डिसेंबर 2023
चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024
पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024 ह्या दिवशी अमावस्या आहे.
लक्ष्मी माताची कृपा नेहमी आपल्यावर राहावी, तिचा सहवास नेहमी आपल्या घरात रहावा आपला संसार सुख समधानाचा व्हावा म्हणून मार्गशीष महिन्यातील गुरवारचे हे व्रत दरवर्षी करावे.
मार्गशीष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी माता पूजा कशी करावी:
* गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून निर्मल मनाने पूजेला बसावे. संपूर्ण दिवस उपवास करावा संध्याकाळी गोडाचा नेवेद्य दाखवून गाईला घास देवून मग आपण उपवास सोडावा.
* प्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर सडा रांगोळी घालावी लक्ष्मीची पावल काढावी.
* पूजा मांडताना देवी आईचे मुख पूर्व किंवा उत्तर ह्या दिशेला असावे.
* पूजा जेथे मांडायची आहे ती जागा स्वच्छ करावी तेथे चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालावे. बाजूनी रांगोळी काढून त्यावर हळद-कुंकू घालावे.
* चौरंगावर तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवावी. त्यावर कलश ठेवावा. कलशाला पाच बाजूनी हळद कुंकू ची बोटे लावावी. त्यामध्ये पाच प्रकारची पाच-पाच पाने ठेवावी (आंब्याची, जास्वंदी, कण्हेर, चाफा, अशोका) कलशमध्ये पाणी घालावे, हळद-कुंकू, अक्षता, एक सुपारी, दूर्वा, कॉईन घालावे. मग त्यावर एक नारळ ठेवावा. नारळाला हळद-कुंकू, अक्षता, फूल वाहावे. कलशाला देवीचा मुखवटा व वस्त्र घालावे म्हणजे कलशाला देवीचे रूप येते. त्यावर फुलाची वेणी व चुनरी घालावी.
* कलशाच्या बाजूला तांदळाची रास करून गणपती व लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. किंवा फोटो असेलतर फोटो ठेवावा. फोटोला हळद-कुंकू, अक्षता व फुलांचा हार घालावा. बाजूला लक्ष्मी यंत्र ठेवावे. त्याची पूजा करावी.
* बाजूला 5 फळे ठेवावी. दूध व साखर वाटीमद्धे ठेवावे. दोन विडयाची पाने ठेवून त्यावर खारीक, खोबरे,हळकुंड,सुपारी,बदाम व एक कॉईन ठेवावे. हे कॉईन चारी गुरुवार पूजेमद्धे ठेवावे मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे. बाजूला तेलाचा अखंड दिवा लावावा. तुपाचे निरांजन व आगरबत्ती लावावी.
* लक्ष्मी माताच्या पूजेची मांडणी झाल्यावर प्रथम प्रार्थना करावी. मग आरती म्हणून कहाणी वाचावी. कहाणी वाचताना आजूबाजूच्या लोकांना बोलवावे. संध्याकाळी गोडचा नेवेद्य दाखवून उपवास सोडावा.
* शुक्रवारी सकाळी कलाशतील पाणी घरामध्ये शिंपडावे. व बाकीचे पाणी तुळशीला घालावे. पाने-फुले बाजूला काढून ठेवावी. तांदूळ आपण वापरावे.
* पूजेतील नारळ तसाच ठेवावा कारण आपल्याला चारी गुरुवारी तोच नारळ वापरायचा आहे. चारी गुरुवारी अश्या प्रकारे पूजा मांडून घ्यावी. शेवटच्या गुरुवारी 7 कुमारिकांना किंवा सुवासिनिना हळद कुंकूसाठी बोलवावे. त्यांना लक्ष्मी व्रताची एक एक प्रत, फळ व दूध देवून हळद-कुंकू द्यावे.
* मग दुसऱ्या दिवशी सर्व फुले, व नारळ नदीमध्ये विसर्जित करावे.
मार्गाशीष महालक्ष्मी माताची अश्या प्रकारे पूजा अर्चा करून लक्ष्मी माताची कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मीचे व्रत करताना काटेकोर पणे नियम पाळा.