मार्गशीर्ष गुरुवार 2023-2024 व्रत उद्यापन 4 थ्या का 5 व्या गुरुवारी अमावस्या आहे?
ह्यावर्षी 5 गुरुवार शेवट्याच्या गुरुवारी अमावस्या आहे?
अमावस्या दिवशी व्रत, पूजा, उद्यापन करावे का?
Margashirsha Mahina Guruvar Mahalakshmi Vrat Udyapan Kadhi Karave? In Marathi
मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023 ला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती 11 जानेवरी 2024 ला होत आहे. तसेच 11 जानेवारीला अमावस्या आहे.
मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे जे करतात त्याच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी 4 गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सौवाष्ण घरी बोलवतो.
पण ह्या वर्षी 5 गुरुवार आले आहेत व शेवट्याच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर काय करावे. आज आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर येथे पाहणार आहोत.
मार्गशीर्ष गुरुवार 2023-2024 व्रत उद्यापन 4 थ्या का 5 व्या गुरुवारी अमावस्या आहे? ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: मार्गशीर्ष गुरुवार 2023-2024 व्रत उद्यापन
आपण मार्गशीर्ष च्या चार गुरुवारी व्रत, पूजा मांडणी करावयाची आहे. तसेच पाचव्या गुरुवारी सुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे. ह्या वर्षी पाच गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे.
11 जानेवारीला 2024 गुरुवार ह्या दिवशी अमावस्या आहे तर ह्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत, पूजा मांडणी नेहमी प्रमाणे करावयाचे आहे. अमावस्या ही तिथी शुभच असते. आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या ह्या तिथीलाच लक्ष्मी पूजन करतो. अमावस्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो. तसेच कुमारिका किंवा सौवाष्ण महिलांना घरी संध्याकाळी बोलवून हळदी कुंकू करून भेटवस्तु व लाल फूल देवून महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देवून खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे. महालक्ष्मी व्रतचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे. अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपण 5 वाजून 27 मिनिट झाल्यावर सुद्धा उद्यापन, नेवेद्य किंवा हळदी-कुंकू करू शकता.
11 जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणी मुळे उद्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेर गावी जाणार असाल किंवा कोणत्या सुद्धा अन्य कारणा मुळे उद्यापन करणे शक्य नसेल त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते.
मार्गशीर्ष महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे ही व्रत करावे त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुख समृद्धी मिळते.
मार्गशीर्ष महिन्याच्या पाची गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशा वरील नारळ, फूल-पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे.