स्वादिष्ट झणझणीत हिरव्या मसाल्याची अंडा करी अगदी निराळी पद्धत पहाताच क्षणी लगेच बनवायल
Tasty Spicy Green Masala Egg Curry In Marathi
आपण ह्या अगोदर अंडी वापरुन बरेच पदार्थ कसे बनवायचे ते पाहिले. आज आपण अजून एक हिरवा मसाला वापरुन एक मस्त झणझणीत अंडा करी बनवणार आहोत.
घरात कधी भाजी नसते किंवा काय करायचे ते समजत नाही अश्या वेळी एक निराळी अंड्याची डिश बनवा सर्वाना आवडेल. आता थंडीचा सीझन चालू आहे तर अंडी सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत.
Tasty Spicy Green Masala Egg Curry Anda Curry In Marathi ह्या विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: स्वादिष्ट झणझणीत हिरव्या मसाल्याची अंडा करी
हिरव्या मसाला मधील अंडा करी बनवताना कोथिंबीर, आल-लसूण, हिरवी मिरची वापरली आहे त्याच बरोबर अजून काही साहित्य वापरले आहे त्यामुळे तिची टेस्ट मस्त लागते. घरात कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या पद्धतीने अंडा करी बनवा सर्वाना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 अंडी (उकडून)
2 टे स्पून बटर
2 टे स्पून तेल
2 मोठा कांदा (बारीक चिरून)
2 टे स्पून दही
1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
2 टे स्पून मलई
मीठ चवीने
हिरवा मसाला (वाटण):
2 वाट्या कोथिंबीर (चिरून)
10-15 लसूण पाकळ्या
1” आले
3-4 हिरव्या मिरच्या
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल किंवा बटर
5-6 लसूण (ठेचून)
2-3 लाल सुक्या मिरच्या
कृती: प्रथम अंडी उकडून बाजूला ठेवा. कांदा बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. मग अंडी सोलून मधोमध उभी अगदी हळुवार पणे कापून घ्या. म्हणजे एका अंड्याचे दोन तुकडे करायचे.
हिरवा मसाला: चिरलेली कोथिंबीर, आल-लसूण, हिरवी मिरची व 2 टे स्पून पाणी वापरुन मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका पॅन मध्ये 2 टे स्पून बटर किंवा तेल गरम करून त्यामध्ये कापलेली अंडी उलट ठेवावी म्हणजे कापलेली बाजू आतल्या बाजूला ठेवावी. 2-3 मिनिट मंद विस्तवावर तसेच ठेवा मग हळुवारपणे अंडी एका प्लेटमध्ये काढून घ्या.
आता त्याच पॅन मध्ये अजून एक टे स्पून तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून 2-3 मिनिट तेल सुटे पर्यन्त परतावे. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ चविणे घालून मिक्स करून दही घाला. दही घातल्यावर परत 2 मिनिट गरम करावे.
आपला मसाला तयार झाला आहे आता त्यामध्ये 1 कप पाणी घालून मसाला 3-4 मिनिट शिजवून घ्या.
मग त्यामध्ये अंडी ठेवा आता अंड्याची योक असलेली बाजू वरच्या बाजूला ठेवायची मग झाकण ठेवून एक मिनिट गरम करायला ठेवा.
आता आपल्याला दुसऱ्या विस्तवावर फोडणी तयार करायची त्यासाठी फोडणीची वाटी गरम करायला ठेवून त्यानधे 2 टे स्पून बटर किंवा तेल गरम करून ठेचलेला लसूण व लाल मिरच्या घालून लसूण गुलाबी रंगावर झाला की लगेच अंडीच्या करी मध्ये घालून परत लगेच झाकण ठेवा म्हणजे लसणाचा सुगंध करी लागेल व करी स्वादिष्ट बनेल मग एक मिनिट तसेच ठेवून आपण पराठा किंवा चपाती बरोबर अंडा करी सर्व्ह करू शकतो.