ट्रिक : थंडीच्या दिवसात इडली-डोसाचे बॅटर (पीठ) चांगले आंबवण्यासाठी एक सिक्रेट ट्रिक
इडली-डोसा बॅटरमध्ये इनो किंवा सोडा नवापरता
Tip & Tricks: How To Ferment Idli-Dosa Batter in Winter Season
आपण इडली डोसा बनवतो आपल्या घरात सर्वाना आवडतो. तसेच इडली डोसा ही डिश खूप लोकप्रिय सुद्धा आहे. पण आपले इडलीचे बॅटर म्हणजेच पीठ चांगले आंबवलेगेले नाही तर आपली इडली छान मऊ लुशलूशीत होत नाही. मग आपला सगळा मूड जातो. तसेच घरातील मेंबर्स सुद्धा नाराज होतात.
थंडीच्या दिवसात इडली-डोसाचे बॅटर (पीठ) चांगले आंबवण्यासाठी एक सिक्रेट ट्रिक ह्या विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: इडली-डोसाचे बॅटर (पीठ) चांगले आंबवण्यासाठी एक सिक्रेट ट्रिक
इडलीचे पीठ किंवा डोशाचे पीठ उन्हाळ्यात छान फसफसून येते. पण पावसाळा सीझन असला किंवा थंडीचा सीझन असला तर ते पीठ फुलत नाही मग इडली सुद्धा हलकी होत नाही किंवा डोसा सुद्धा तव्याला चिकटतो.
थंडीच्या दिवसांत किंवा पावसाळा सीझन मध्ये इडली किंवा डोसा बनवायची असेलतर त्यासाठी एक सीक्रेट टीप आहे.
समजा आपण सकाळी ब्रेकफास्ट साठी इडली किंवा डोसा बनवणार आहोत तर आधल्या दिवशी सकाळी डाळ व तांदूळ भिजत ठेवा. तांदूळ हे राशनचे वापरले तर उत्तम त्याने इडली मस्त हलकी होते. तर तांदूळ बासमती वापरू नका किंवा आंबेमोहर सुद्धा वापरू नका.
तांदूळ 2 वाट्या व उदीडदाळ 1 वाटी स्वच्छ धुवून पाणी घालून 5-6 तास भिजत ठेवा.
मग संध्याकाळी बारीक वाटून मिक्स करून घ्या. रात्री इडली बॅटर च्या भांड्यावर झाकण ठेवल्यावर त्यावर एक स्वच्छ कपडा घालून त्यावर उबदार ब्लँकेट किंवा लोकरीचे वस्त्र घाला व रात्रभर तसेच ठेवा. सकाळी आपण जेव्हा इडली करायला भांड्यावरील झाकण काढल तेव्हा पहा आपले इडलीचे बॅटर फुलून अगदी डबल झालेले असेल.
मग त्या बॅटर नी इडली स्टँड मध्ये इडली बनवून घ्या. मग बघा आपली इडली कशी हलकी फुलकी होते. जर डोसा बनवायचा असेलतर डोसा बनवा तव्याला आजिबात चिकटणार नाही.
आहे की नाही मस्त टीप थंडीच्या दिवसांत इडली बॅटर कसे अंबवून घ्यायचे जर आपल्याला आमची रॉयल शेफ सुजाता साइट आवडली तर subscribe करा तसेच Royal Chef Sujata ह्या Channel ला सुद्धा subscribe करायला विसरू नका.