मुलांची स्मरणशक्ति वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय
Tips: How To Improve Your Child’s Memory In Marathi
मुलांच्या लक्षात रहात नाही करा स्मरणशक्ति वाढवण्यासाठी घरगुती उपाय
जर आपल्या मुलांची स्मरणशक्ति कमजोर आहे त्यामुळे तुम्ही परेशान आहात तर सोपे घरगुती उपाय त्यांच्या रोजच्या जीवनात शामील करून ह्या समस्या दूर होतील.
काही मुलांची लहान पणापासून स्मरणशक्ति कमजोर असते. ते लहान पणापासूनच सारखे विसरत असतात त्यांना अक्षर लक्षात ठेवायला त्रास होतो. मग सुरवातीला आई-वडील ह्या कडे दुर्लक्ष करतात मग जेव्हा हळू हळू ही समस्या वाढायला लागते तेव्हा हा विषय चिंतेचा बनतो. जर आपण सुरवाती पासूनच ह्या समस्याकडे लक्ष दिले तर गंभीर समस्याना तोंड द्यावे लागत नाही.
मुलांची स्मरणशक्ति वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: मुलांची स्मरणशक्ति वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय
आज आपण ह्या लेखात मुलांची स्मरणशक्ति वाढण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय कसे करायचे ते पाहू या हे सोपे घरगुती उपाय नक्की कामाला येतील व आपल्या मुलांची स्मरणशक्ति वाढून त्याचा फायदा होईल.
1. मुलांची नीट झोप होणे जरुरीचे आहे:
मुलांची झोप नीट झाली तर त्यांच्या स्मरणशक्ति मध्ये वाढ होते. मुल जेव्हा झोपेत असतात तेव्हा विचार करणे, समजून घेणे व लक्षात ठेवण्याची शक्ति आपोआप वाढते. त्यासाठी मुलांना शांतपणे झोपून द्यावे व त्यांची झोप पूर्ण होऊ द्यावी.
2. पोषक तत्वाची पूर्ती करा:
मुलांच्या डाएट मध्ये बदल करून त्यांची स्मरणशक्ति वाढवू शकतो. काही रिसर्च मध्ये असे म्हणतात की मुलांच्या रोजच्या खाण्या पिण्याच्या सवाईमध्ये विटामीन डी, विटामीन b1, b12, b6, आयर्न व आयोडीन शालीम केले व त्याच बरोबर एंटीऑक्सीडेंट तत्व मुलांच्या डाएटमध्ये जोडले तर त्यांची विचार करण्याची व समजन्याची शक्ति आपोआप वाढते.
3. मुलांना कोडी सोडवण्यास मदत करा:
मुलांनी फक्त घरबाहेरील खेळ किंवा घरातील खेळ खेळून त्यांचा विकास होत नाही तर त्यांना त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी व त्यांचा मानसिक विकास होण्यासाठी कोडी सोडवायला द्या किंवा कोडी सोडवण्यासाठी त्यांना मदत करा. अश्या नी त्यांची स्मरणशक्ति वाढेल.
4. मुलांनाच बनवा टीचर:
फक्त मुलांना शिकवणे हे करता मुलांना बनवा टीचर व तुम्ही व्हा विद्यार्थी त्यामुळे मुलांना विषय चांगला समजेल व त्यांना गोडी निर्माण होऊन त्यांच्या बरोबर लक्षात राहायला लागेल व त्यांचा मानसिक विकास होईल.
5. मुलांना बाहेर घेऊन जात जा:
आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मुलांना बाहेर घेऊन गेले तर त्यांना नवीन नवीन गोष्टीची माहिती होईल, त्यांचे नॉलेज वाढून त्यांचा मानसिक विकास होईल. अशी प्रैक्टिस ठेवली तर मुलांची नक्की स्मरणशक्ति वाढण्यास मदत होईल.
6. मुलांना अभ्यास करताना जोर जोरात वाचायला सांगा:
काही मुलांना मनातल्या मनात वाचून लक्षात नाही रहात व ते पटकन विसरून जातात. तर त्यांना अभ्यास करताना मोठ्यांनी वाचायला सांगा त्यामुळे त्यांना त्यांचा आवाज आइकू येईल व लक्षात ठेवणे सोपे जाईल. मुलांनी जोरात वाचले तर त्यांच्या लवकर लक्षात राहते.
7. आपल्या मुलांना चांगला वक्ता बनवा:
फक्त आपले मत दुसऱ्यां समोर सांगणे मांडणे जरुरीचे नाही. तर मधून मधून दुसऱ्यांचे पण आइकून घेतले पाहिजे. आपण दुसऱ्याचे काही ण आईकता आपलेच मत दुसऱ्यांवर लादले तर लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यामुळे आई वडिलांनी मुलांना शिकवले पाहिजे की दुसऱ्यांचे म्हणणे आईकले पाहिजे व तसे प्रेरित सुद्धा केले पाहिजे. असे समजावल्याने मुलं दुसऱ्यांचे आईकायला शिकतील व त्यांचा विकास सुद्धा होईल.
8. अभ्यास सुद्धा जरूरी आहे:
मुलांनी फक्त एकदा लक्षात ठेवणे काफी नाही तर त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सारखा त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे जास्त दिवस ती गोष्ट लक्षात राहील व त्यांची स्मरणशक्ति वाढेल. मुलांना काही शिकवल्यावर मधून मधून त्या गोष्टी बद्दल विचरत चला किंवा त्यांना वाचायला लाऊन मग लिहायला सुद्धा सांगत चला.
9. मुलांना मुबलक पाणी सेवन करण्यास द्यावे:
लहान मूल आपली स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. ते आपला अभ्यास, शाळा, खेळ ह्यामध्ये बिझी असतात तेव्हा आई-वडिलांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे की रोजच्या जीवनात पाणी पिण्याचे काय महत्व आहे. तसे मुलांना पाणी पिण्यासाठी अलार्म सुद्धा लाऊन देऊ शकतात व मुलांना सांगू शकतात की पाणी सेवन केल्याने आपली स्मरणशक्ति वाढते.
10. छोट्या छोट्या कामामध्ये मुलांची मदत घ्या:
आई आपल्या मुलांना काही काम करायला देत नाही पण मुलांना छोट्या छोट्या कामामध्ये मदत करायला सांगितले तर त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होऊ शकतो. मुलांना बाहेरून काही सामान आणणे किंवा छोटा काही हिशोब असेलतर त्यांना करायला लावणे त्यामुळे त्यांचा मानसिक विकास होतो.
11. मुलांना तूप सेवन करायला द्या:
मुलांच्या डाएट मध्ये तूप शामील करा त्याने स्मरणशक्ति वाढेल. तुपाच्या सेवनाने मुलांची स्मरणशक्ति वाढते.
12. शब्द जोडून वाक्य कसे बनवायचे ते शिकवा:
मुलांची स्मरणशक्ति वाढण्यासाठी आई-वडिलांनी त्याना शब्द जोडून वाक्य कसे बनवायचे ते शिकवा. असे केल्याने मुलांची समजून घेण्याचे शक्ति वाढते.