टिप्स अँड ट्रिक्स: हिरवा मटार मिनिटात जादुई पद्धतीने सोलून वर्षभर स्टोर करून ठेवा
Tips & Tricks: Hirva Vatana Solnyachi Jadui Padhat Minitat Sola Kilo Bhar In Marathi
आता हिवाळा सीझन चालू झाला आहे. तेव्हा बाजारात सर्वत्र आपल्याला हिरवे ताजे मटार दिसतात. आपल्या घरात मटार असतील तरी आपल्याला ताजे मटार बघून घेण्याचा मोह होतो.
टिप्स अँड ट्रिक्स: हिरवा मटार मिनिटात जादुई पद्धतीने सोलून वर्षभर स्टोर करून ठेवा ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: टिप्स अँड ट्रिक्स: हिरवा मटार मिनिटात सोलण्याची जादुई पद्धत
आपण जास्त मटार घेतले तरी ते एका जादुई ट्रिकनी वर्षभर साठवून ठेवू शकतो या मग लागेल तसे काढून वापरू शकतो.
हिरवे मटार वापरुन आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. हिरवे मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत. आपण बरेच पदार्थ मटार टाकून बनवतो त्या शिवाय आपली डिश अधुरी आहे. व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव, मटर पनीर इ.
हिरव्या मटारमध्ये आयुर्वेद गुणधर्म बरेच आहेत. जे गंभीर आजारांवर सुद्धा गुणकारी आहेत. शरीराचे वजन कमी करायचे असेल तर मटर नियमित सेवन करा, त्यामध्ये एंटीऑक्सीडेंटचे गुणधर्म आहेत त्यामुळे कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. रोग प्रतिकार शक्ति वाढते. आपली स्कीन व केसांचे आरोग्य चांगले राहते. आर्थराइटिसवर फायदेमंद आहे म्हणून आपण योग्य पद्धतीने मटार स्टोर करून ठेवू या.
आपण पुढे दिलेल्या ट्रिक नी मटार सोलले तर मिनिटात किलोभर मटार सोलून वर्षभर स्टोर करू शकता.
आपण हिरवा ताजा मटार घरी आणला तर एक किलोग्राम वटाणा असेलतर तेव्हडे मटार बसतील असे मोठ्या आकाराचे भांडे घ्या. मग त्यामध्ये स्वच्छ 3/4 भांडे पाणी भरून विस्तवावर गरम करायला ठेवा. पाणी चांगले गरम झालेकी त्यामध्ये मटार घाला भांड्यावर झाकण ठेवा व दोन मिनिट परत गरम करायला ठेवा. मग दोन मिनिट झालेकी झाकण काढून ठेवा.
एक मोठी चाळणी घ्या व त्यामध्ये मटार मधील पाणी काढून मटार चाळणीमध्ये काढून घ्या. पाणी निथळलेकी मटारवर एक बाटली थंड पाणी ओता म्हणजे मटार शिजण्याची प्रक्रिया थांबेल.
आता परत सर्व मटार भांड्यात ठेवा त्यामध्ये पाणी ओता व एक मटार घेवून बाजूनी थोडा दाबा लगेच सर्व मटारचे दाणे बाहेर येतील अश्या प्रकारे सर्व मटार दाणे झटपट काढून घ्या जास्त वेळ लागणार नाही सर्व मटारचे दाणे काढून झालेकी एक नॅप्किन घेवून त्यावर सर्व मटारचे दाणे 10-15 मिनिट पसरवून ठेवा. मग झिपलॉक प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून ठेवा. लॉक नीट लावा व डिपफ्रीजमध्ये ठेवा. पाहिजे तेव्हा थोडे मटार काढून घेवून परत बॅग डीपफ्रीजमध्ये ठेवा.
आपल्याला आवडलिना हिरवा ताजा मटार सोलण्याची जादुई पद्धत.