कांदे-बटाटा पोहे खाऊन कंटाळा आला बनवा पारंपारिक झटपट सोपे दडपे पोहे
Traditional Maharashtrian Dadpe Pohe Recipe In Marathi
पोहे हा पदार्थ महाराष्ट मधील लोकप्रिय डिश आहे. आपण कांदा पोहे किंवा बटाटा पोहे किंवा मटार पोहे बनवतो मग अश्या प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा आला तर बनवा सोपे झटपट स्वादिष्ट दडपे पोहे.
दडपे पोहे बनवायला अगदी सोपे झटपट होणारे आहेत. तसेच त्याची टेस्ट खूप छान लागते सारखे खावेसे वाटतात. लहान मोठे सर्वजण आवडीने खातात. जर आपल्याकडे छोटीशी पार्टी आहे किंवा कोणी अचानक पाहुणे आले तर दपडे पोहे बनवा सर्वजण आवडीने खातील.
पारंपारिक झटपट सोपे दडपे पोहे ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: दडपे पोहे
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 कप पोहे
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
3/4 कप ओले खोबरे (खोवून)
1 टे स्पून लिंबूरस
1 टी स्पून साखर
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून मीठ
2 टे स्पून नारळाचे पाणी (असेलतर)
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
2 टे स्पून शेंगदाणे
10-12 कडीपत्ता पाने
1/4 टी स्पून हिंग
3-4 हिरव्या मिरच्या
कृती: प्रथम कांदा बारीक चिरून घ्या, ओले खोबरे खोवून घ्या, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
पोहे निवडून चालून घ्या. हिरव्या मिरच्या तुकडे करून घ्या.
एक स्टीलच्या मोठ्या आकाराच्या भांड्यात कांदा, ओले खोबरे, मीठ, लिंबूरस व साखर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये पातळ पोहे घालून मिक्स करून घ्या. पोहे मिक्स करून झाल्यावर 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा. जर आपल्याकडे नारळाचे पाणी असेलतर थोडे नारळाचे पाणी शिंपडून घ्या.
एक फोडणीच्या कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता पाने, शेंगदाणे, व हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून मिक्स करून घ्या. मग ती फोडणी पोह्यावर घालून मिक्स करून घ्या.
आता दपडे पोहे सर्व्ह करायचे तेव्हा बाउल मध्ये दडपे पोहे घेऊन वरतून कोथिंबीर, ओले खोबरे व बारीक शेव घालून सर्व्ह करा.