वास्तुटिप्स: तुमच्याकडे सदाफुलीचे रोप आहे ह्या दिशेला लाऊन फायदे बघा
Vastu Tips: Sadabahar Plant Vastu Direction At Home In Marathi
वास्तुशास्त्र मध्ये झाड फूल ह्याचे विशेष महत्व आहे. आपल्याला सदाफुलीचे रोप किंवा त्याचे फूल माहीत असेलच. आपला घरातील अंगणात किंवा बाल्कनी मध्ये सदाफुली असणे खूप शुभ मानले जाते. आपल्याला माहिती असेलच सदाफुलीला वर्षभर फूल येतात म्हणूनच त्याचे नाव आहे सदाफुली. सदाफुलीची फूल दोन रंगाची असतात एक गुलाबी व दुसरी पांढरी.
घरात सदाफुली लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. त्याच बरोबर घरातील व्यक्तीचे जीवन शांत होते व नाते संबंध सुधारून प्रेम वाढते.
वास्तुटिप्स: तुमच्याकडे सदाफुलीचे रोप आहे ह्या दिशेला लाऊन फायदे बघा ह्या आर्टिकलची विडियो लिंक पूढी दिलेली आहे तेथे आपण पाहू शकता:सदाफुली
वास्तुशास्त्र नुसार घरात सदाफुलीचे रोप लावल्याने पती-पत्नी मधील संबंध सुधारतात व त्याच्या मधील प्रेम वाढते व घरात सुख शांती येते.
सदाफुलीची फुले आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हितावह आहेत. त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत त्याच्या आर्टिकलची लिंक पुढे दिलेली आहे तेथे आपण पाहू शकता: सदाफुलीची फुले आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे
आता आपण पाहूया घरात सदाफुलीचे रोप लावल्याने वास्तुशास्त्र नुसार त्याचे काय फायदे होतात व रोप लावण्याची दिशा कोणती आहे.
सदाफुली ही रोप शनि, राहू व केतू ही ग्रहांना शुभ बनवण्यास मदत करते.
घरात पूर्व दिशेला सदाफुलीचे रोप लावल्याने असे म्हणतात की घरातील व्यक्तीचा मान-सन्मान वाढतो.
सदाफुली व मनीप्लांट ह्या रोपांना उत्तर दिशेला लावल्याने सुख-समृद्धीमध्ये वाढ होते.
सदाफुलीचे रोप आग्नेय दिशेला लावल्याने सकारात्मकताचा विकास होतो.
वास्तुशास्त्र नुसार घराच्या परिसरात गुलाब, तुळस, चमेली, बेला ही रोपे लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे शास्त्रू नाश होतो, धनसंपदा मध्ये वृद्धी होते. व संतती सुख मिळते.
सदाफुली आपण दक्षिण दिशेला लावणे सुद्धा उत्तम आहे. सदाफुली ही नेहमी म्हणजे वर्षभर फुलत असते त्यामुळे घरात सदाफुली लावली तर घरातील व्यक्तिमध्ये नेहमी म्हणजेच कायम चांगले संबध राहतात त्यांच्या मध्ये प्रेम राहून नाते संबंध घट्ट होतात. घरच्या बाहेर ही रोप लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.
सदाफुली ही फूल भगवान शनि, राहू व केतू ह्यांना प्रिय आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सदाफुली ही फूल त्यांना अर्पण करू शकता.