हेल्दी कॉलिफ्लॉवर नाश्ता एकदम निराळा दोन प्रकारे मुलांच्या डब्यासाठी-नाश्तासाठी
Ekdam Different Style Cauliflower Nashta 2 Types For Kids Tiffin In Marathi
कॉलिफ्लॉवरची भाजी म्हंटले की मुले तोंड वाकडे करतात मुळात मुलांना भाज्या खायचा कंटाळा येतो. मग आपण भाज्या वापरुन त्याचे नवीन नवीन पदार्थ बनवतो. जेणे करून मुलांच्या पोटात भाज्या जातील. तसेच रोज मुलांना डब्यात काय द्यायचे हा प्रश्न पडतो. तसेच मुलांना पौष्टिक द्यायला पाहिजे.
हेल्दी कॉलिफ्लॉवर नाश्ता एकदम निराळा दोन प्रकारे ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: कॉलिफ्लॉवर नाश्ता
आज आपण असाच नवीन पदार्थ बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काही पौष्टिक पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे अगदी आवडीने खातील किंवा मोठ्यांना सुद्धा हा पदार्थ आवडेल.
आपण कॉलिफ्लॉवर वापरुन दोन प्रकारे पदार्थ बनवणार आहोत. तसेच बनवायला सोपे आहेत व झटपट होणारे आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 20-25 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य: प्रकार पहिला:
1 1/2 कप कॉलिफ्लॉवर
1/4 कप कांदा (चिरून)
1/4 कप टोमॅटो (चिरून)
1/2 कप कोथिंबीर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
3/4 कप बेसन
2 टे स्पून तांदळाचे पीठ
2 टे स्पून दही
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
मीठ चवीने
दुसऱ्या प्रकारामध्ये
2 टे स्पून गव्हाचे पीठ
तेल शालोफ्राय करण्यासाठी
कृती: कॉलिफ्लॉवर धुवून किसून घ्या. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेला कॉलिफ्लॉवर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आल-लसूण, हिरवी मिरची, बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, चिली फ्लेस्क, मीठ व दही घालून मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट वाटले तर त्यामध्ये 2 टे स्पून पाणी घालून मिक्स करून घ्या. आता मिश्रणाचे दोन भाग करा.
पहिला प्रकार: एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा भांड्यात एक प्लेट ठेवा. एक स्टीलच्या प्लेट किंवा ट्रे ला तेल लाऊन घ्या. एक भाग घेऊन तेल लावलेल्या प्लेटमध्ये एक सारखा करून ट्रे गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा त्यावर झाकण ठेवून 12-15 मिनिट वाफवून घ्या. मग ट्रे बाहेर काढून थंड झाल्यावर त्याचे तुकडे कापून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा त्यामध्ये थोडे तेल घालून त्यावर कापलेले तुकडे ठेवा बाजून थोडे तेल सोडा. दोन्ही बाजूनी छान करुकुरीत फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
दूसरा प्रकार: आपण दूसरा भाग घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून अगदी थोडेसे मीठ व मिरची पावडर घालून 1/2 कप पाणी घालून मिश्रण सारखे करून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालून एक मोठा डाव मिश्रण घालून हळुवार पणे पसरवून बाजूनी थोडेसे तेल घालून 2-3 मिनिट झाकण ठेवा विस्तव मंद ठेवा. मग झाकण काढून उलट करून परत थोडेसे तेल बाजूनी घालून परत 2-3 मिनिट झाकण ठेवा. मग झाकण काढून उलट पलट करून छान कुरकुरीत होई पर्यन्त शालो फ्राय करून घ्या.
आता गरम गरम टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.