2 बटाटे व 1 वाटी रवा मस्त कुरकुरीत नाश्ता, इडली वडा विसरून जाल
2 Batate W 1 Cup Rava Mast Kurkurit Nashta Idli Vada Visrun Jau Recipe In Marathi
आपल्याला रोज प्रश्न पडतो किंवा नाश्तासाठी काय बनवायचे किंवा साइड डिश म्हणून काय बनवायचे किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर काय बनवायचे. मुलांना सुद्धा रोज नवीन पदार्थ पाहिजे असतात.
आज आपण 2 बटाटे व 1 वाटी रवा वापरुन एक खूप मस्त कुरकुरीत रेसीपी बनवणार आहोत. आपण ही रेसीपी बनवून बघा नक्की सगळ्याना आवडेल.
आपण मेदू वडे बनवताना उडीद डाळ भिजवतो किंवा इडली बनवताना तांदूळ व डाळ भिजवतो ही डिश बनवताना डाळ तांदूळ न भिजवता आपण मेदू वडे बनवू शकतो. तसेच आंबवण्याची सुद्धा गरज नाही.
The text 2 Batate W 1 Cup Rava Mast Kurkurit Nashta Idli Vada Visrun Jal in Marathi be seen on our You tube Chanel 2 Batate W 1 Cup Rava Mast Kurkurit Nashta Idli Vada Visrun Jal
आपण फक्त बटाटे किसून घ्यायचे आहेत व रवा वापरुन त्यामध्ये कधी साहित्य मिक्स करायचे आहे. चला तर मग आपण पाहू या हा नवीन प्रकारचा नाश्ता कसा बनवायचा आहे:
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 वडे बनतात
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 कप बारीक रवा
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1/4 टी स्पून हळद
एक चिमूट हिंग
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
मीठ चवीने
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे धुवून सोलून किसून घ्या. मग स्वच्छ पाण्यांनी धुवून घेऊन पाणी काढून टाका, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून 1 1/4 कप पाणी घाला, पाणी गरम झालेकी त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून रवा व चिली फ्लेस्क घालून मिक्स करून घ्या. रवा शिजला व मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
आता मिश्रण थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊन पाण्याचा हात लाऊन मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोल गोळे बनवून घ्या. गोळ्याला छान मेदू वड्या सारखा आकार द्या.
तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालेकी त्यामध्ये वडे छान गुलाबी रंगावर कुरकुरीत असे तळून घ्या.
गरम गरम वडे चटणी बरोबर सर्व्ह करा.