22 जानेवारी 2024 सोमवार श्रीराम आयेगे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारा दिवस अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
22 January 2024 Shri Ram Pran Pratishtha Mahiti Marathi
भारताच्या इतिहास मधील 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारा दिवस ठरणार आहे. हा क्षण सर्वांसाठी सर्वात सुंदर एतीहासिक होणार आहे.
22 जानेवारी 2024 हा दिवशी सर्व रामभक्त ह्या एटीहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये 70 एकर भूखंडावर भव्य मंदिर बनून श्रीरामलला ह्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. 22 जानेवारी ह्या दिवसाची सर्वजन आतुरतेने वाट पहात आहेत. सर्वांमध्ये मंदिर उद्घाटनाची उत्सुकता वाढत आहे. त्यासाठी भव्य तयारी सुद्धा चालू आहे. आयोध्या बरोबरच संपूर्ण भारतभर श्रीराम ह्यांच्या आगमनाची जय्यत तयारी चालू आहे. प्रतेक रामभक्तमध्ये उत्साह ये. एक आठोडया पासून सर्वठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. गर्भगृहामध्ये श्रीराम ह्याच्या मूर्तीची स्थापना होणार आहे ते क्षण खूप महत्वाचा व सुंदर आहे.
22 जानेवारी ह्या दिवसांसाठी भारतात बहुसंख्य रामभक्त घरोघरी जाऊन आमंत्रण देवून अक्षता देत आहेत. भारतातील व भारता बाहेरील प्रतेक भारतीय ह्या दिवसासाठी आपले तन मन अर्पित करीत आहे. सर्व भारतभर मंगलमय वातावरण पसरले आहे.
आपल्या सर्वाना आमंत्रण व अक्षता मिळाल्या आहेत. त्या आपण 22 जानेवारी ह्या दिवशी श्रीराम ह्यांना अर्पित करायच्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या मधील थोड्या अक्षता ठेवून जेव्हा कधी अयोध्या ह्या पवित्र ठिकाणी जाऊन अर्पित करायच्या आहेत. व ज्यांना शक्यनाही त्यांनी घरात श्रीराम ह्यांच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोर अर्पित करायच्या आहेत किंवा आपल्या घराच्या जवळपास श्रीराम मंदिर असेल तेथे जाऊन अक्षता अर्पित करायच्या आहेत. त्यादिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ श्रीराम ह्यांच्या आगमनसाठी दीपक प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरात श्रीराम ह्यांची भजन म्हणायची आहेत व त्यांचे मनोभावे स्वागत करायचे आहे.
श्रीराम ह्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेळ:
रामलीला ह्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेळ फक्त 84 सेकंद शुभ मुहूर्त आहे.
22 जानेवारी 2024 सोमवार दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद पासून 12 वाजून 30 मिनिट 32 सेकंद पर्यन्त आहे.
राम मंदिर मध्ये 15 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यन्त शेड्यूल:
15 जानेवारी 2024: 15 जानेवारी मकर संक्रांती त्याच बरोबर खरमास समाप्ती आहे. ह्या दिवशी श्रीराम ह्यांच्या बालरूपची मूर्ती स्थापित केली आहे.
16 जानेवारी 2024: ह्या शुभदिवशी रामलला ह्यांच्या विग्रहच्या अधिवासाचे अनुष्ठान सुरू झाले आहे.
17 जानेवारी 2024: ह्या दिवशी श्रीराम ह्यांच्या मूर्तीची अयोध्याभर मिरवणून निघणार आहे.
18 जानेवारी 2024 ह्या दिवशी श्रीराम ह्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठाची सुरुवात होणार आहे. त्याच बरोबर मंडप प्रवेश पूजन, वास्तु पूजन, गणेश पूजन, वरुण पूजन, विघ्नहर्ता व मूर्ती पूजन होणार आहे.
19 जानेवारी 2024: ह्या दिवशी राम मंदिरमध्ये अग्नि कुंडची स्थापना होणार आहे. त्याच बरोबर अरणी मंथन मधून यज्ञसाठी अग्नि प्रज्वलित करणार आहेत. मग नवग्रह होम होणार आहे.
20 जानेवारी 2024 राम मंदिरच्या गर्भगृहमध्ये 81 कलश ठेवणार आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पवित्र नद्यांचे पाणी आहे.
21 जानेवारी 2024 ह्या तिथीला यज्ञमध्ये विशेष पूजन व हवनमध्ये राम ललाचे 125 कलशानि दिव्य स्नान होणार आहे ही खूप खास आहे.
22 जानेवारी 2024 ह्या दिवशी दुपारी मृगशिरा नक्षत्रमध्ये रामलला च्या मूर्तीची गर्भगृहमध्ये स्थापना होणार आहे व विधिपूर्वक पूजा अर्चा होणार आहे.