22 जानेवारी श्रीराम ह्यांना त्यांचे अत्यंत प्रिय राघवदास लाडूचा नेवेद्य दाखवा नक्की कृपा मिळेल
22 January Raghav Das Ladoo For Shri Ram Bhagwan Bhog Recipe In Marathi
22 जानेवारी 2024 सोमवार ह्या दिवशी राम लला ह्यांची आयोध्या ह्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होणार आहे. रामभक्तांचे बऱ्याच वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. संपूर्ण भारत व भारता बाहेरील देश सुद्धा श्री राम ह्यांचे नाम स्मरण करीत आहेत. संपूर्ण भारत मंगलमय झाला आहे. प्रतेक राम भक्त आपल्या परीने राम लला ह्यांच्या प्राण प्रतिष्ठा साठी मनोभावे काम करीत आहे.
22 जानेवारी 2024 सोमवार दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद पासून 12 वाजून 30 मिनिट 32 सेकंद पर्यन्त श्री नरेंद्र मोदी जी ह्यांच्या हस्ते श्री राम भगवान ह्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. ही पुण्याचे काम फक्त श्री नरेंद्र मोदीजी करू शकले आहेत. भारता मधील प्रतेक व्यक्ति राममय झाला आहे. श्री राम भगवान ह्यांची प्राण प्रतिष्ठा म्हणजेच हा क्षण सुवर्ण अक्षरात लिहून ठेवता येणार आहे.
The text 22 January Raghav Das Ladoo For Shri Ram Bhagwan Bhog in Marathi be seen on our You tube Chanel 22 January Raghav Das Ladoo For Shri Ram Bhagwan Bhog
22 जानेवारी ह्या दिवशी भगवान श्री राम ह्यांना लाडू चा भोग दाखवून त्यांची कृपा मिळवा. कारण की राम लला ह्यांना लाडू अत्यंत प्रिय आहेत.
आज आपण राघवदास लाडू शुद्ध तुपातले कसे बनवायचे ते पाहू या.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 20 बनतात
साहित्य:
1 कप बेसन (जाड रवा)
1 कप रवा
1 कप तूप अथवा वनस्पति तूप
1 टी स्पून वेलची पावडर
बदाम काप, किसमिस
2 कप साखर
125 ग्राम खवा
1/4 कप दूध
एक चिमूट केशरी रंग
कृती: जाड बुडाच्या कढईमध्ये निम्मे तूप घालून मंद विस्तवावर रवा खमंग भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर बाजूला काढून ठेवा. मग त्याच कढईमध्ये राहिलेले तूप घालून बेसन भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर खमंग असा सुगंध आला की दुधाचा हबका मारून त्यामध्ये भाजलेला रवा मिक्स करून झाकून बाजूला ठेवा.
कढईमध्ये खवा छान गुलाबी रंगावर परतून घ्या. मग रवा बेसनच्या मिश्रणात घालून वेलची पावडर, बदाम व किसमिस घालून मिक्स करून घ्या.
कढईमध्ये साखर व 3/4 कप पाणी घेऊन एक तारी पाक बनवा त्यामध्ये थोडासा केशरी रंग मिक्स करा मग विस्तव बंद करून रवा-खवाचे मिश्रण त्यामध्ये मिक्स करून 6-7 तास झाकून बाजूला ठेवा. मिश्रण थोडे घट्ट होईल मग लाडू वळताना किसमिस व बदाम काप लाऊन लाडू वळा.
टीप: हे लाडू फक्त 5-6 दिवस टिकतात कारण की त्यामध्ये खवा आहे.