देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा का लावावा? त्याचे बरेच लाभ आहेत
Devgharat Tilachya Telacha Diva Ka Lavtat? Tyache Fayde Kay Ahet In Marathi
आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने बरेच लाभ होतात.
आपण देवाची पूजा अर्चा करताना देवा समोर दिवा लावतो. मग तो आपण तेलाचा किंवा तुपाचा लावतो. तेलाचा दिवा लावताना आपण कोणत्या सुद्धा तेलाचा वापर करू शकतो. म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल. आपण बऱ्याच लोकांना घरात देवा समोर दिवा लावताना मोहरीचे तेल वापरुन दिवा लावताना पाहिले असेल. पण आज आपण पहाणार आहोत की मोहरीच्या तेला बरोबरच आपण तिळाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकतो त्याचे बरेच लाभ आहेत.
आता आपण पाहू या तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने काय लाभ होतात.
माता लक्ष्मी प्रसन्न होते:
धार्मिक मान्यता अनुसार, जर आपण रोज देवाच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येवून धनाची कमी होत नाही.
शनिग्रह दोष पासून छुटकारा मिळेल:
शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. असे म्हणतात की शनि देवा समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास व्यक्तीच्या कुंडली मधील शनि दोष निघून जातो.
काही ग्रहांची शक्ति वाढते:
आपण रोज देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर कुंडली मधील मंगल ग्रह मजबूत होतो. तसेच कुंडली मधील चंद्र ह्या ग्रहाची स्थिती मजबूत बनते.
नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते:
आपण घरात जर रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावत असाल तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील क्लेश दूर होऊन सुख समृद्धी येते.
वास्तु दोष संपतो:
घरात देवा समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावावा त्यामुळे वास्तु दोष संपतो. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात.
दिवा लावताना काही नियम आहेत:
पूजेमद्धे कधी सुद्धा तुटलेला दिवा लावू नये.
तुपाचा दिवा लावताना नेहमी कापसाची पांढरी वात वापरावी.
तेलाचा दिवा लावताना लाल मॉलिचा वापर करावा.
दिवा लावताना नेहमी दिवा देवा समोरच ठेवावा.
तुपाचा दिवा नेहमी डाव्या हाताला ठेवतात.
तेलाचा दिवा नेहमी उजव्या हाताला ठेवतात.
पूजा करताना दिवा कधी सुद्धा विजवू नये कारण मध्येच दिवा विजवला तर आपली पूजा पूर्ण होत नाही.