Don’t do these things on Kinkrant | Karidin 16 January 2024 Article in Marathi
16 जानेवारी करीदीन म्हणजेच किंक्रांत ह्या दिवशी चुकूनही ही कामे करू नका वर्षभर पीडा मागे लागेल.
मकर संक्रांत हा सण तीन दिवस असतो. पहिला दिवस भोगी, दूसरा दिवस संक्रांत व तिसरा दिवस किंक्रांत म्हणजेच करीदीन होय. किंक्रांत हा दिवस आपण जसा ग्रहण दिवस असतो तसा मानायचा असतो. आपण ग्रहण काळात कोणतेसुद्धा चांगले काम करीत नाही. तसेच किंक्रांत ह्या दिवशी सुद्धा कोणते सुद्धा चांगले काम करायचे नाही.
किंक्रांत ह्या दिवसी शांत रहायचे. उद्या वादविवाद, भांडण, किरकिर कटकट ह्यापासून दूर रहायचे नाहीतर वर्षभर आपल्या मागे कटकट लागते. किंक्रांत ह्या दिवशी वाईट लोक किंवा वादविवाद करणाऱ्या लोकांन पासून दूर रहायचे. आपल्या जीवनात कोणीना कोणी अशी व्यक्ति असते की तिचे तोंड पाहिले तरी आपल्याला राग येतो. किंवा कोणती व्यक्ति आपल्याला आवडत नाही तर अश्या लोकांपासून दूर राहायचे.
किंक्रांत ह्या दिवशी आपण सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करून देव पूजा करावी. संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केले असेल ते उचलून ठेवावे. आपल्या इष्टदेवतांची पूजा अर्चा करावी. आपल्या घराचे मेन डोर साफ करून रांगोळी काढा.
किंक्रांत ह्या दिवशी आपल्या स्वामींचा दिवसभर जाप करा. म्हणजेच श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा किंवा श्री गुरुदेव दत्त ह्यांचे चरित्र वाचा, तारक मंत्र 108 वेळा म्हणा, किंवा श्री स्वामी समर्थ ह्यांचा ह्या मंत्राचा जाप करा, किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जाप करा. किंवा नामस्मरण करा, असे केल्याने आपण डायरेक्ट देवाशी जोडले जातो किंवा आपले मन त्यामध्ये रमते त्यामुळे मनात वाईट विचार येत नाहीत तसेच वाईट लोकांशी संपर्क येत नाही. आपण माता लक्ष्मीचे सुद्धा नामस्मरण करू शकता. त्यामुळे आपले मन शांत राहते.
आपल्या घरात सुद्धा काही कारणा मुळे वादविवाद होत असतील तर ते टाळा, उद्या जपून रहा. म्हणजे आपले संपूर्ण वर्ष चांगले जाईल. उद्या सकाळी घरात फरशी पुसताना पाण्यात खडेमीठ टाकून फरशी पुसा, तसेच संध्याकाळी घरात कापुर जाळा, पण कापुर जाळताना त्यामध्ये थोडे तूप व 2 लवंग घाला त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा घरात येईल.