10 मिनिटांत ढाबा स्टाइल स्वादिष्ट कुकरमध्ये बटर पनीर अगदी निराळी पद्धत
In 10 Minutes Dhaba Style Swadisht Butter Paneer In Pressure Cooker Recipe In Marathi
पनीर हे लहान असो किंवा मोठे लोक सर्वाना आवडते. पनीर वापरुन आपण
बरेच पदार्थ बनवू शकतो. पनीर मसाला किंवा बटर पनीर मसाला आपण घरी बनवतो. पनीर बटर मसाला बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
The text In 10 Minutes Dhaba Style Swadisht Butter Paneer In Pressure Cooker in Marathi be seen on our You tube Chanel In 10 Minutes Dhaba Style Swadisht Butter Paneer In Pressure Cooker
आज आपण पनीर बटर हे अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तसेच अगदी सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटांत बनवणार आहोत. आपण घरी सुद्धा अगदी बाहेर सारखे पनीर बनवू शकतो, पनीर कसे बनवायचे त्याची text लिंक पुढे दिलेली आहे. पनीर कसे बनवायचे (Homemade Paneer)
घरच्या घरी पनीर कसे बनवायचे ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे. सोप्या पद्धतीने घरी पनीर बनवा
बटर पनीर बनवताना आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये मध्ये मसाला परतून त्याला शिट्या काढून अगदी ढाबा स्टाइल बनवणार आहोत. तसेच अश्या प्रकारचा बनवलेला बटर पनीर मसाला छान क्रिमी बनतो.
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून पहिले पाहिजेत. पनीरच्या डीशेष सर्वाना आवडतात आपण हॉटेलमध्ये गेलोकी पनीर ऑर्डर करतो, किंवा कोणत्यासुद्धा पार्टीमध्ये पनीरची डिश असतेच.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य: मसाला करिता:
2 टे स्पून बटर
3 मध्यम आकाराचे कांदे
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
8-10 लसूण पाकळ्या
1” आले
7-8 काजू
2 लाल सुक्या मिरच्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
बटर पनीर करिता:
2 टे स्पून बटर
200 ग्राम पनीर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1 टे स्पून फ्रेश क्रीम
1 टी स्पून कसूरी मेथी
1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
कृती: आपण जर घरी पनीर बनवणार असालतर प्रथम पनीर बनवून घेऊन बाजूला ठेवा. कांदा व टोमॅटो चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
मसाला करिता: प्रेशर कुकरमध्ये बटर घालून त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, काजू, लाल सुक्या मिरच्या, आले व लुसण 5 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर व 1/2 कप पाणी घालून 3 शिट्या काढून घ्या. प्रेशर कुकर थंड झाल्यावर मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यामध्ये पनीरचे तुकडे थोडे गरम करून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालून थोडा परतून घ्या. मसाला परतून झालकी त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, हळद, मीठ गरम मसाला घालून मीठ घाला, मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये फ्रेश क्रीम व 1/2 कप पाणी किंवा आपल्याला जशी ग्रेव्हि पाहिजे तशी करून घ्या. मग शेवटी कोथिंबीर, कसूरी मेथी व दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालून मिक्स करून गरम गरम सर्व्ह करा.
बटर मसाला सर्व्ह करताना वरतून फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून पराठा, चपाती किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करा.