किचन टिप्स: किचनच्या भिंतीवरील चिकटपणा काढण्याच्या स्मार्ट गृहीणींसाठी सोप्या टिप्स
Kitchen Tips And Tricks: Kitchen chya Bhintivar Chikat Daag Kadhnyachya Sopya Tips In Marathi
किचन मध्ये स्वयंपाक करताना भिंतीवर तेलाचे डाग पडतात. पदार्थ तळताना तेल उडते किंवा स्वयंपाक करताना वाफ भिंतीवर जाते व भीत खराब होते. तेलाचे दाग फक्त भिंतीवरच नाहीतर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड, एग्जॉस्ट फॅन, टाइल्स, डब्बे ह्यांना सुद्धा घाण करतात. मग त्यावर हळू हळू धुळ जमा होते. मग त्यावर धुळीचा व तेलाचा एक प्रकारचा लेयर तयार होतो मग आपल्याला बऱ्याच वेळा ते साफ करायला वेळ मिळत नाही व ते डाग जिद्दी होऊन मग काढणे मुश्किल होऊन जाते. त्याचा परिणाम आपल्या घरातील राहणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर होतो.
आज आपण किचनमध्ये भिंतीवरील तेलाचे जिद्दी डाग कसे काढायचे ते पाहू या व त्यामुळे आपल्या किचनची भिंत कशी चमकुन निघेल.
आपण अश्या प्रकारे आपल्या किचनची भिंत साफ करू शकता:
1) विनेगर (व्हेनिगर):
प्रतेक घरात व्हेनिगर बहुतेक करून असतेच. त्याचा उपयोग आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. एका भांड्यात व्हेनिगर घेऊन त्यामध्ये स्वच्छ कापड किंवा स्पंज पूर्णपणे डुबवून पिळून घ्या. मग ते कापड किंवा स्पंजने स्विचबोर्ड व किचनच्या भिंती पुसून घ्या. त्यामुळे तेलाचे डाग अगदी सहज निघून जातील. मग दुसरे एक स्वच्छ कापड घेऊन पुसून काढा. व्हेनिगर आपल्या घराच्या भिंती वरील बैक्टीरिया सुद्धा नष्ट करतील.
2) लिंबुरस व सोडा:
किचन मधील तेलाचे डाग साफ करण्यासाठी लिंबु कापून डाग पडलेल्या जागी चोळून मग पाण्यात सोडा घालून त्यामध्ये कापड बुडवून डाग पडलेली जागा स्वच्छ करू शकता. त्यामुळे डाग निघू शकतात.
3) मीठ (नमक):
मिठाचा वापर करून जिद्दी डाग सहज काढू शकता,. सर्वात पहिल्यांदा जेथे डाग पडले आहेत त्याजागी मीठ शिंपडुन थोडा वेळ तसेच ठेवा. मग तेल मीठ शोषून घेईल त्या जागेवर व्हेनिगर स्प्रे करून कापडानी पुसून काढल्याने डाग निघून जातील.
4) बेकिंग सोडा:
किचनच्या भिंती वरील डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला एक कप गरम पाणी घेऊन त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालून स्पंज किंवा कपडा त्यामध्ये बुडवून डाग पुसून घ्या ते निघून जातील.
5) डिशवॉशिंग लिक्विडचा उपयोग करा:
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये 2 मोठे चमचे डिशवॉशिंग लिक्विड टाका. तेलाचे डाग लवकर साफ करायचे असतील तर कॉम्बिनेशन खूप उपयोगी पडते. मिश्रणात स्पंज डुबवून डाग पडलेल्या जागी थोडे घासून काढा मग स्वच्छ कापडानी डाग पुसून काढा.