मकर संक्रांतीला करा 14 सटीक उपाय लक्ष्मीकृपा मिळेल
Makar Sankranti 2024 Satik Upay Kelyane Labh In Marathi
पंचांगा नुसार ह्या वर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 सोमवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये येतो म्हणून सूर्य उपासना केली जाते. तसेच ह्या दिवाशी सूर्य उत्तरायण होते त्यामुळे देवी-देवतांचे दिवस सुरू होतात, अश्या वेळी आपण काही उपाय केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होते धनवृद्धी होऊन सुख समृद्धी मिळते.
मकरे संक्रांती ह्या दिवशी करा हे 14 उपाय:
1) गाईला चारा: आपल्याला माहिती आहेच गाईमद्धे 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे. त्यामुळे ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला त्यामुळे सुख समृद्धी टिकून राहते.
2) स्नान: मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते पण आपल्याला नदीवर स्नान करणे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पानात थोडे गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे त्यामुळे पुण्य मिळते.
3) तिळाचे हवन: मकर संक्रांती ह्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ घालून देवी लक्ष्मीला हवन करा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन नेहमी कृपा ठेवेल.
4) दान: मकर संक्रांती ह्या दिवशी दान धर्म करण्याचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ, व सौभाग्य साहित्य दान करावे त्यामुळे कृपा मिळते.
5) पतंग उडवण्याचे महत्व: मकर संक्रांती ह्या दिवशी पतंग उडवण्याचे विशेष महत्व आहे. रामायणामध्ये असे म्हंटले आहे की पतंग उडवण्याची परंपरा श्री राम ह्यांनी सुरू केली. असे म्हणतात की ह्या दिवशी श्री राम ह्यांनी पतंग उडवला होता तेव्हा तो पतंग इन्द्रलोकात पोचला होता. म्हणून ह्या दिवशी पतंग उडवतात.
6) तीळ व गुळाचे सेवन: मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गूळ सेवन केल्याने दारिद्रता नष्ट होते. तसेच ह्या दिवशी थंड असते त्यामुळे तीळ-गूळ सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते.
7) पितरांना तर्पण: मकर संक्रांती ह्या दिवशी पितरांना तर्पण अर्पण करा त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते व वंश वाढतो.
8) खिचडीचा नेवेद्य: मकर संक्रांती ह्या दिवशी तांदूळ, डाळ, भाज्या,गूळ व तूप घालून बनवलेले खिचडीचे विशेष महत्व आहे. खिचडी सेवन केल्याने नवग्रह प्रसन्न होतात.
9) झाडू खरेदी: मकर संक्रांती ह्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
10) धान्यची पूजा: जानेवारी महिन्यात नवीन पीक येतात,ह्या दिवशी शेती उपकरणाची पूजा करतात. धान्यांची पूजा करतात. त्यामुळे अन्नाची कमतरता भासत नाही.
11) नवीन कार्य: मकर संक्रांती च्या दिवसा पासून नवीन कार्य करण्यास सुरुवात करतात ह्या दिवशी नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय धंदा, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी मिळते.
12) मंत्र जाप: मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य देवाचा मंत्र म्हणतात त्यामुळे लाभ होतो. मंत्र: ॐ सूर्याय नम:
13) लक्ष्मी पूजन: मकर संक्रांती ह्या दिवशी 14 कवड्याना गंगाजलामध्ये स्नान घालून पूजा करतात. तसेच 108 वेळा ॐ संक्रांत्याय नम: हा मंत्र जाप करावा.
14) शनिदेव व सूर्य पूजन करावे: सूर्य पूजन केल्याने करियरमध्ये लाभ होते. व शनिपूजन केल्याने संकट दूर होतात.