Nutritious Shengdana Ladoo | Peanut-Jaggery Ladoo For Kids Recipe In Marathi
आरोग्यदायी शेंगदाणा लाडू बिना साखरेचे अगदी पौष्टिक रोज फक्त एक खा
शेंगदाणे व गूळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आजकाल आपले जीवन ही खूप धावपळीचे झाले आहे. बरेच वेळा आपल्याला सकाळी नीट नाश्ता खायला वेळ मिळत नाही जेवणाच्या वेळा सुद्धा नीट पाळल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला काही रोगांना सामोरे जावे लागते. बरेच वेळा आपण सकाळी पौष्टिक काही खाण्याच्या आयवजी फास्ट फूड खातो मह त्यांचे बरेच तोटे आपल्या शरीराला भोगावे लागतात.
आपण फास्ट फूड घेण्याच्या आयवजी असे पटकन खाऊ शकणारे पदार्थ सेवन केलेतर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा सुद्धा होऊ शकतो.
आपण सकाळी मूठभर शेंगदाणे व थोडासा गूळ खाला तर पूर्ण दिवस आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण सकाळी बिस्किट व कुकीज खाण्याच्या आयवजी शेंगदाणा लाडू खाला तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होईल.
आरोग्यदायी शेंगदाणा लाडू बिना साखरेचे विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: शेंगदाणा लाडू बिना साखरेचे
शेंगदाणा लाडू बनवायला अगदी सोपे आहेत तसेच बनवायला फक्त काही मिनिट लागतात. आपण आठोडयातून एकदा बनवून ठेवले तर रोज एक लाडू आपण सेवन करू शकतो.
शेंगदाणा लाडू बनवताना त्यामध्ये साखरेच्या आयवजी गूळ वापरला आहे. गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे. तसेच त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, ड्रायफ्रूट व साजूक तूप वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 20 लाडू
साहित्य:
1 कप शेंगदाणे
1/2 कप डेसिकेटेड कोकनट
1/4 कप ड्रायफ्रूट
3/4 कप गूळ
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
कृती: प्रथम शेंगदाणे भाजून सोलून घ्या. डेसिकेटेड कोकनट थोडे गरम करून घ्या. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे व गूळ घेऊन थोडे ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, ड्रायफ्रूटचे तुकडे, वेलची पावडर व तूप घालून परत एकदा ब्लेंड करून घ्या.
आता मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊन त्याचे छोटे छोटे गोल लाडू बनवा. लाडू बनवून झालेकी डब्यात भरून ठेवा.