चविष्ट मसालेदार मटर पनीर बिना कांदा-लसूण ढाबा स्टाइल
Tasty Spicy Matar Paneer without Onion Garlic Restaurant Style In Marathi
आता हिरव्या गार ताज्या मटरचा सीझन आहे. हिरवे ताजे मटर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहेत. आपण बाजारात भाजी आणायला गेलो तर आपल्याला हिरवे ताजे मटर जिकडे तिकडे पहायला मिळतात. मग आपण जास्तीचे मटर घेऊन ते सोलून फ्रीजमद्धे साठवून ठेवतो मग वर्षभर त्याचे नानाविध पदार्थ बनवतो.
टेस्टि स्पायसी मटर पनीर बिना कांदा-लसूण ढाबा स्टाइल ह्या textची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे आपण क्लिक करून पाहू शकता: Matar Paneer without Onion Garlic
आज आपण मटर पनीर बनवणार आहोत ते पान त्यामध्ये कांदा-लसूण न वापरता. बरेच जण कांदा लसूण खात नाहीत किंवा आपण नवरात्री मध्ये किंवा इतर दिवशी उपवास असेल तेव्हा कांदा-लसूण न वापरता नेवेद्य बनवून देवाला दाखवतो. कांदा लसूण हे आपण नॉनव्हेज साठी वापरतो व ते तामसी आहे म्हणून नेवेद्यच्या ताटात कांदा-लसूण न वापरता पदार्थ बनवतात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1/2 कप हिरवे ताजे मटार
1 कप पनीर (तुकडे करून)
3 मोठे टोमॅटो (चिरून)
2 हिरव्या मिरच्या
1” आले (एच्छिक)
1/4 कप काजू
1 तमालपत्र
1/2 टी स्पून हिंग
1 टी स्पून जिरे
1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टे स्पून फ्रेश क्रीम
1 टी स्पून कसूरी मेथी
मीठ चवीने
3 टे स्पून तेल
कृती: हिरवे ताजे मटर वाफवून बाजूला ठेवा. पनीरचे तुकडे करून 1 टे स्पून तेल गरम करून थोडे फ्राय करून घेऊन बाजूला ठेवा. टोमॅटो चिरून घ्या.
कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये हिंग व तमलपत्र घालून टोमॅटो, काजू, आले व हिरवी मिरची घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. थंड झाल्यावर तमालपत्र बजूला काढून बाकीचे साहित्य वाटून घ्या.
कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून बाजूला काढून ठेवलेले तमालपत्र घालून वाटलेला मसाला घाला. मसाला मंद विस्तवावर चांगला परतून घ्या. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून 1 मिनिट परतून घ्या. आता लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ घालून 1/2 कप पाणी व मटार घालून झाकण ठेवून 5-7 मिनिट मसाला शिजवून घ्या.
आता झाकण काढून 1/4 कप पाणी घालून गरम झालेकी त्यामध्ये पनीर व कसूरी मेथी घालून मिक्स करून एक चांगली वाफ येवू द्या.
गरम गरम मटर पनीर चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.