13 फेब्रुवारी 2024 गणेश जयंती शुभ मुहूर्त, पूजाविधी, महत्व व उपाय
13 February 2024 Ganesh Jayanti Shubh Muhurat, Puja Vidhi, Mahatva VA Upaay In Marathi
गणेश जयंती ह्या दिवशी गणेश भगवान ह्यांची विधिपूर्वक पूजा अर्चा व व्रत ठेवल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व सुख-समृद्धीची प्रती होते.
हिंदू पंचांग अनुसार दरवर्षी माघ महिन्यात शुक पक्ष चतुर्थी ह्या तिथीला गणेश जयंती साजरी करतात. त्यालाच माघ विनायकी चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. ह्या वर्षी गणेश चतुर्थी 13 फेब्रुवारी मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी श्री गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा व व्रत ठेवल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
The 13 February 2024 Ganesh Jayanti Shubh Muhurat, Puja Vidhi, Mahatva VA Upaay in Marathi be seen on our You tube Chanel 13 February 2024 Ganesh Jayanti Shubh Muhurat, Puja Vidhi, Mahatva VA Upaay
चला आपण पाहू या गणेश जयंती शुभ मुहूर्त, महत्व व पूजाविधी
हिंदू पंचांग नुसार माघ महिन्यातील चतुर्थी तिथी:
12 फेब्रुवरी सोमवार संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिट पासून सुरू होत असून 13 फेब्रुवरी मंगळवार दुपारी 2 वाजून 41 मिनिट ला समाप्ती होत आहे. उदय तिथी नुसार गणेश जयंती 13 फेब्रुवरी ह्या दिवशी आहे.
श्री गणेश जयंती 2024 शुभ योग:
हिंदू पंचांग अनुसार श्री गणेश जयंती ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी च्या बरोबर साध्य व सिद्धी योग येत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7 वाजून 4 मिनिट ते दुपारी 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त आहे.
श्री गणेश जयंती 2024 महत्व:
गणेश जयंती ह्या दिवशी सर्वात प्रथम पूज्य भगवान गणपतीची पूजा अर्चा करायची आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी पूजा व व्रत केल्याने सर्व विघ्न दूर होतात व सुख-समृद्धीची प्रती होते व त्याच बरोबर जीवनात सुख समृद्धी मिळते.
श्री गणेश पूजाविधी:
माघ गणेश चतुर्थी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून संकल्प करा व गणेश भगवान ह्यांची पूजा सुरू करा. सर्वांत पहिल्यांदा एक चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र घालून त्यावर गणेश भगवान ह्यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. मग आचमन करून गणेश भगवान ह्यांना वस्त्र, माळ, फुलांचा हार, हळद-कुंकू, अक्षता, अर्पित करा. मग भोग दाखवताना बुंदी लाडू किंवा मोदक दाखवून धूप लाऊन गणेश मंत्र, गणेश चालीसा, गणेश स्त्रोत्र, गणेश चतुर्थी व्रत कथाचे वचन करा मग शेवटी विधिपूर्वक आरती करून चूक भूलची माफी मागा.
गणेश जयंती ह्यादिवशी करावयाचे उपाय:
* गणेश चतुर्थी ह्यादिवशी श्री गणेश भगवान ह्यांच्या मूर्तीची किंवा फोटोची प्राण प्रतिष्ठा करून त्यांची नियमित पूजा अर्चा करा. त्यामुळे कुंडलीमधील बुध ग्रह जर कमजोर असेलतर त्यामध्ये सुधारणा होईल व बुध ग्रहाच्या दोषा पासून शांती मिळेल.
* गणेश चतुर्थी ह्या दिवशी गणेश मंदिरमध्ये जाऊन हिरव्या रंगाची वस्तु दान करा. ज्याना जरूरत आहे किंवा गरीब व्यक्तीला हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा. त्यामुळे आपल्या कुंडलीमधील बुध ग्रह दोष दूर होऊन आपली कामे पूर्ण होतील.
* भगवान गणेशजीनची कृपा मिळण्यासाठी गणेश चतुर्थी ह्या दिवशी हिरव्या मुगाची डाळ व तांदूळ दान करावे किंवा पक्षांना खायला द्यावे.
* श्री गणेश भगवान ह्यांना दूर्वा अतिप्रिय आहेत. चतुर्थी च्या दिवशी गणेश मंदिर मध्ये जाऊन ११ किंवा २१ दूर्वाची जुडी अर्पित केल्याने आपल्या जीवनातील परेशानी दूर होतील.