16 फेब्रुवारी 2024 रथ सप्तमी मुहूर्त सूर्यपुजा लाभ व दूध उतू का घालावे?
16 February 2024 Ratha Saptami Muhurat Labh W Dudh Utu Ka Ghalawe?
सनातन धर्ममध्ये सूर्य हा पूजनीय मानतात. काही साधक रोज सकाळी सूर्याला अर्ध देतात. धार्मिक मान्यता अनुसार असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी तिथी ही भगवान सूर्य ह्यांना समर्पित आहे. ह्या दिवशी भगवान सूर्य ह्यांचा जन्म दिवस ह्या रूपात मानला जातो. असे म्हणतात की ह्या दिवसा पासून सूर्य देवानी पूर्ण विश्वला प्रकाश दिला होता. म्हणूनच ह्या दिवसाला सूर्य जयंती असे सुद्धा म्हणतात.
The 16 February 2024 Ratha Saptami Muhurat Labh W Dudh Utu Ka Ghalawe? in Marathi be seen on our You tube Chanel 16 February 2024 Ratha Saptami Muhurat Labh W Dudh Utu Ka Ghalawe?
रथ सप्तमी शुभ मुहूर्त: (Ratha Saptami Shubh Muhurat)
माघ मास शुल्क पक्ष तिथी आरंभ 15 फेब्रुवारी सकाळी 10 वाजून 12 मिनिट समाप्ती 16 फेब्रुवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिट
उदय तिथी 16 फेब्रुवारी शुक्रवार म्हणून ह्या दिवशी रथ सप्तमी आहे
रथ सप्तमी सूर्योदय – सकाळी 06 वाजून 59 मिनट
रथ सप्तमी स्नान मुहूर्त – सकाळी 05 वाजून 17 मिनट ते सकाळी 06 वाजून 59 मिनट
रथ सप्तमी पूजाविधी:
रथ सप्तमी ह्या दिवशी अरुणोदयमध्ये स्नान केले पाहिजे. सूर्योदय झाल्यावर अर्ध्य द्यावे व विधी पूर्वक पूजा केली पाहिजे. अर्ध्य देताना सूर्य देवा समोर उभे राहून नमस्कार करून मग एक छोट्या कलशमध्ये पाणी घेऊन हळू हळू अर्ध्य द्या. मग गाईच्या तुपाचा दिवा लावा मग लाल रंगाचे फूल अर्पित करा.
रथ सप्तमी पूजा लाभ:
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा अर्चा केल्याने साधकाला आरोग्य व त्याच बरोबर समृद्धी प्राप्त होते. ह्या दिवशी दान धर्म केल्यास पुण्य मिळते. तसेच व्रत ठेवल्यास सर्व पापा पासून मुक्ती मिळते. रथ सप्तमी च्या दिवशी अरुणोदयच्या वेळी स्नान करण्याचे विशेष महत्व आहे.
असे केल्याने व्यक्तिला चांगले स्वास्थ मिळते. म्हणूनच ह्या दिवसाला आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हणतात. सूर्य सप्तमीच्या दिवशी अर्ध्य दिल्याने आयुष्य वाढते, आरोग्य व समृद्धी मिळते. माघ महिन्याच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी येते त्यामुळे सूर्य देवाला अर्ध्य दिले तर 7 महा पापा पासून मुक्ती मिळते.
रथ सप्तमी ह्या दिवशी दूध उतू का घालावे?
रथ सप्तमीच्या दिवशी घरासमोरील अंगण स्वच्छ करून सडा घालून तुळशी वृंदावन समोर 7 घोडे व सूर्य ची रांगोळी काढण्याची प्रथा आहे तसेच खीर बनवून त्याचा नेवेद्य दाखवतात. सूर्य देवाची उपासना करतात.
रथ सप्तमी ह्या दिवशी अंगणात किंवा आपल्या घराच्या टेरेसवर चूल पेटवून दूध गरम करतात. दूध गरम करताना त्यावर सूर्य किरण आले पाहिजे, मग दूध उतू गेल्यावर ते दूध घरातील व्यक्तिना भोग म्हणून सेवन करण्यास द्यावे किंवा त्याची खीर बनवून द्यावी. त्यामुळे रोग होत नाहीत व अडचणी निघून जातात.
महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती पासून रथ सप्तमी ह्या दिवसा पर्यन्त विवाहित महिला हळदी-कुंकू करतात.