9 फेब्रुवारी 2024 मौनी अमावस्या मौन व्रत ठेवण्याचे महत्व व नियम
9 February 2024 Mauni Amavasya Importance In Marathi
पौष अमावस्या ह्या दिवशी स्नान-दान च्या व्यतिरिक्त मौन व्रत ठेवण्याचे विशेष महत्व आहे. मौनी अमावस्या ह्या दिवशी पूजा-पाठ, जप-तप-साधना करण्याच्या बरोबर मौन ठेवावे. ह्या वर्षी 9 फेब्रुवारी 2024 शुक्रवार ह्या दिवशी मौनी अमावस्या आहे.
The text 9 February 2024 Mauni Pousha Amavasya Importance In Marathi in Marathi be seen on our You tube Chanel 9 February 2024 Mauni Pousha Amavasya Importance
हिंदू पंचांग नुसार मौनी अमावस्या:
आरंभ 9 फेब्रुवरी सकाळी 8 वाजून 2 मिनिट
समाप्ती: 10 फेब्रुवारी सकाळी 4 वाजून 28 मिनिट
हिंदू धर्मामध्ये अमावस्याचे विशेष महत्व आहे. पौष मास कृष्ण पक्ष मधील येणारी अमावस्या मौनी अमावस्या म्हणून संबोधली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी मनुष्यानी मौन ठेवून गंगा, यमुना किंवा कोणत्या सुद्धा पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. मुनि ह्या शब्दा पासूनच मौनी ह्या शब्दाची उत्पत्ति झाली. असे सुद्धा म्हणतात की मौनी अमावस्या ह्या दिवशी मौन ठेवून व्रत केल्यास मुनि पदाची प्राप्ती होते. पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी सृष्टिचे संचालक मनु ह्यांचा जन्म झाला होता म्हणूनच ह्या दिवसाला मौनी अमावस्या असे म्हणतात.
मौनी अमावस्याचे महत्व:
शास्त्रानुसार मौनी अमावस्या ह्या दिवशी प्रयागराजच्या संगमावर स्नान करण्याचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी देव पितर ह्यांचा संगम होतो. असे म्हणतात की ह्या महिन्यात देवतागण प्रयागराज येथे येऊन अदृश्य रूपात संगमवर स्नान करतात. ह्या दिवशी जप-तप, स्नान, दान केल्यास कितीतरी पट पुण्य मिळते.
मौनी अमावस्या ह्या दिवशी मौन का ठेवतात?
मौनी अमावस्या ह्या दिवशी प्रयागराज मधील संगमावर स्नान कल्यास मोक्ष प्राप्ती मिळते व अमृता समान फळ मिळते. ह्या दिवशी मौन ठेवण्याचे महत्व आहे. जर आपल्याला मौन ठेवणे शक्य नसेलतर तोंडातून अपशब्द काढू नये जेणेकरून आपण दुसऱ्याचे मन दुखावले जाणार नाही. कारण की असे म्हणतात ह्या दिवशी आपल्या मनाची स्थिति कमजोर असते. म्हणूनच ह्या दिवशी मौन ठेवायचे असते. भगवान विष्णु व भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करतात.
मौनी अमावस्या व्रताचे नियम:
मौनी अमावस्या ह्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी, कुंड किंवा सरोवरमध्ये स्नान केले पाहिजे जर तसे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल घालून स्नान करावे. मग सूर्य देवाला अर्ध्य द्या. मग व्रत संकल्प करून मौन ठेवायचा प्रयत्न करावा. ह्या दिवशी भुकेल्या व्यक्तीला जेवण दिल्यास पुण्य मिळेल. अमावस्याची दिवशी अन्न, वस्त्र, तीळ, आवळा, कंबळ, पलंग, तूप, व गाईला चारा दिलातर पुण्य मिळते. तसेच अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण दिले तर त्यांना मोक्ष मिळतो. ह्या दिवशी आपले मन, वाणी शुद्ध ठेवावी, अपशब्द वापरू नये तसेच अशुभ विचार सुद्धा करू नये.