Healthy Leftover Banana Recipe For Kids In Marathi
हेल्दी लेफ्टओवर बनाना रेसिपी फॉर किड्स
आपण घरी केळी आणतो, मग त्यातील शेवटची केळी राहिली की ती काळी पडतात, मग ती राहिलेली केळी टाकून सुद्धा देवत नाही किंवा त्याचे काय करावे समजत नाही. आपण ह्या अगोदर राहिलेली केळी त्याचा केक, पॅन केक किंवा बर्फी कशी बनवायची ते पहिले. आता आपण अजून एक नवीन रेसीपी बघणार आहोत.
The text Healthy Leftover Banana Recipe For Kids in Marathi be seen on our You tube Chanel Healthy Leftover Banana Recipe For Kids
आज आपण राहिलेल्या केळ्या पासून एक मस्त मुलांना आवडणारी रेसीपी पाहू या. केळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. केळी ही असे फळ आहे ते आपल्याला वर्षभर बाजारात मिळते.
आपण रोज 1-2 केळी सेवन करतो त्यामुळे शरीराची वजन नियंत्रणात राहते. केळी सेवन केली की पोट लगेच भरते, पोट भरले की लगेच भूक लागत नाही.
केळी सेवन केल्याने मेंटल हेल्थ चांगली राहते. केळ्यामद्धे विटामीन B 6 आहे, केळी सेवन केल्याने आपली स्कीन निरोगी राहते. पोट्याशीयम मुळे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 पिकलेली केळी
1/2 कप साखर
1/2 दूध
1 कप गव्हाचे पीठ
1 टी स्पून वेलची पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा किंवा पावडर
तेल तळण्यासाठी
कृती: 2 पिकलेली केळी सोलून चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिरलेली केळी, साखर व दूध ब्लेंड करून घेऊन एका बाउलमध्ये काढून घ्या.
मग त्यामध्ये गव्हाचे पीठ थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये वेलची पावडर व बेकिंग सोडा घालून हळुवार पणे मिक्स करा. मिश्रण चांगले मिक्स झाले पाहिजे की वरतून टाकताना ते रिबन सारखे पडले पाहिजे.
कढईमध्ये तेल गरम करून घ्या. मग चमच्याच्या सहायानी छोटे छोटे पकोडे सारखे गोळे तेलात सोडा मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व तळून घेऊन गरम गरम सर्व्ह करा.