तमालपत्रचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे व कसे बनवायचे सोपी पद्धत
Home Remedies: Benefits Of Drinking Bay Leaf Water For Health In Marathi
तमालपत्र आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचे पाणी सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
भारतामधील स्वयंपाक घरातील मसाले आपल्या जेवणातील स्वाद वाढवण्यास मदतगार आहे. तसेच आपल्या आरोग्यासाठी ते फायदेमंद सुद्धा आहेत. आपल्या स्वयंपाक घरातील मसाले आपल्या शरीरातील गंभीर परेशानीवर उपयोगी आहेत. त्यातील एक मसाला म्हणजे तमालपत्र होय. त्याच्या सुगंधानी आपल्या पदार्थाला चांगली चव येते व सुगंध येतो. तमालपत्र मध्ये काही पोषक तत्व आहेत.
The Benefits Of Drinking Bay Leaf Water For Health in Marathi be seen on our You tube Chanel Benefits Of Drinking Bay Leaf Water For Health
तमालपत्र मध्ये कॉपर, एंटी -ऑक्सीडेंट, कैल्शियम व आयर्न भरपूर प्रमाणात आहे. तमालपत्रचे पाणी सेवन करणे खूप फायदेमंद आहे. असे म्हणतात की तमालपत्रचे पाणी आपल्या शरीराची एक्स्ट्रा चरबी कमी करते. त्याच त्याचे बरेच फायदे सुद्धा आहेत.
आता आपण पाहू या तमालपत्रचे पाणी सेवन करण्याचे फायदे काय आहेत:
1. शरीराचे वजन कमी करते:
तमालपत्रचे पाणी सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होते. दिवसातून 2-3 वेळ ही पाणी सेवन केलेतर शरीराची जास्तीची चरबी कमी होते. आपण सकाळी उपाशी पोटी, दुपारी जेवण झाल्यावर व रात्री जेवणाच्या 1-2 तास अगोदर सेवन करू शकता. पण एक लक्षात ठेवा की पाणी कोमट सेवन केले पाहिजे तरच शरीराची चरबी कमी होईल.
2. ब्लड शुगर नियंत्रणात राहते:
तमालपत्रचे पाणी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. खर म्हणजे तमालपत्र मध्ये फाइटोकेमिकल्स आहे जे ब्लड शुगर कंट्रोल करते. थंडी मध्ये तमालपत्रचे कोमट पाणी सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
3. इन्फेक्शन दूर होते:
तमालपत्र मध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात असते. त्यामध्ये एंटीबैक्टीरियल गुण भरपूर आहेत. जे इंफेक्शन पासून सुरक्षित ठेवते. थंडीमध्ये नियमित तमालपत्रचे पाणी सेवन केल्याने सर्दी खोकला सारखा सारखा होत नाही.
4. शरीरावरील सूज कमी करते:
तमालपत्र मध्ये सिनेओल असते ते शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते. जर थंडी मध्ये शरीरावर सूज येत असेलतर नियमित तमालपत्रचे कोमट पाणी 2 वेळा सेवन करावे त्यामुळे फायदा होऊ शकतो.
5. किडनी स्टोनच्या परेशानी पासून बचाव होतो:
तमालपत्रचे पाणी किडनी स्टोन च्या परेशानी पासून बचाव करण्यास मदत करते. किडनी स्टोनची परेशानी झाली की तमालपत्रचे पाणी उकळून थंड झाल्यावर दिवसातून 2-3 वेळा सेवन केल्यास किडनी स्टोनच्या परेशानी पासून लाभ होतो.
6. झोपेच्या तक्रारी असतील तर नीट होतील:
अनिद्राची तक्रार असेलतर तमालपत्रचे पाणी लाभदायक आहे. रात्री जेवण झाल्यावर 1-2 तासांनी तमालपत्रचे पाणी सेवन करा त्यामुळे नक्की फायदा होईल.
तमालपत्रचे पाणी कसे बनवायचे:
साहित्य: 2 कप पाणी, 2-3 तमालपत्र, 1/2 टी स्पून दालचीनी पावडर
कृती: प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्याला उकळी आली की त्यामध्ये तमालपत्र टाका मग ते पाणी थोडे उकळले की विस्तव बंद करून त्यामध्ये दालचीनी पावडर घालून मिक्स करून थोडे कोमट झालेकी गाळून आपण कॉफी कशी घेतो त्याप्रमाणे हळू हळू घ्या म्हणजे त्याचा चांगला उपयोग होईल.
टीप: तमालपत्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे पण जर आपल्याला शरीराची कोणती सुद्धा तक्रार असेलतर डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच तमालपत्रचे पाणी सेवन करावे.