मुलांनो अभ्यासाच्या बरोबर हा पावरफुल मंत्र जाप केल्याने अभ्यासात चांगली प्रगती होईल
Most Powerful Shri Ram Mantra For Success In Studies In Marathi
आता बोर्डाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षा चालू आहेत. त्याच बरोबर इतर सुद्धा महत्वाच्या कॉम्पटेटिवएक्झॅम किंवा एंट्रेन्स एक्झॅम चालू आहेत. विद्यार्थी आप आपल्या परीने बरीच मेहनत सुद्धा घेत आहेत. पण अभ्यास करताना परीक्षेचा मानसिक ताण येणे सहाजिकच आहे कारण की अभ्यासाचे प्रेशर आहे.
The Most Powerful Shri Ram Mantra For Success In Studies in Marathi be seen on our You tube Chanel Most Powerful Shri Ram Mantra For Success In Studies
पण बरेच वेळ मेहनत करून सुद्धा आपले मनासारखे काम होत नाही. त्यासाठी आपली मेहनत व विश्वास च्या बरोबर ज्योतिष शास्त्रची साथ मिळाली तर त्याचा उपयोग आपल्या परीक्षेसाठी होऊ शकतो. म्हणजेच
आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपला विश्वास मजबूत बनू शकतो व त्याच बरोबर तुमची एनर्जी लेवल सुद्धा वाढून आपल्याला चांगले गुण मिळू शकतात.
परीक्षेच्या काळात मुलांना अभ्यासाच्या बरोबर आपल्या घरातील व्यक्तीचे सुद्धा प्रेशर असते. त्यामुळे घरातील व्यक्तिनी मुलांना प्रेशर न देता त्यांचे मन कसे शांत राहील टे पहावे. त्याच बरोबर योग्य तो आहार व घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न ठेवले पाहिजे कटकटी भांडणे घरात झाली तर मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
रामचरित मानस मधील चौपाईने मिळेल परीक्षेमध्ये लाभ:
आपण परीक्षेसाठी मेहनत करतो पण काही वेळेस बरीच मेहनत करून सुद्धा आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. तसेच परीक्षेमध्ये सफलता व असफलता अश्या दोन गोष्टी असतातच. आपल्या मेहनती बरोबर आपल्याला जर देवाची साथ मिळाली तर त्याचे परिणाम चांगलेच होऊ शकतात.
ज्योतिष शास्त्र नुसार आपली मेहनत व विश्वास असून सुद्धा आपल्याला जर आपल्या मनासारखे यश मिळत नाही तर आपल्याला रामचरीत मानसला शरण गेले पाहिजे रामचरीत मानस जीवनातल्या बऱ्याच समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे. आपल्याला परीक्षेत यश मिळण्यासाठी रामचरित मानसमध्ये लिहिलेल्या चौपाईचा जाप केल्यास मन शांत राहून प्रगती होते.
सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान राम ह्यांचा फोटो समोर दिवा अगरबत्ती लावून भगवान राम ह्यांना चंदन लावून आपणा स्वताला सुद्धा चंदन लावून मग आसनावर बसावे व पुढे दिलेली चौपाई शांत मनाने 108 वेळा म्हणावी.
आपण आपल्या गुरुवर श्रद्धा व विश्वास ठेवावा त्यामुळे नक्की यश प्राप्त होईल.
चौपाई अश्या प्रकारे आहे.
‘गुरुग्रह गए पढ़न रघुराई, अल्प काल विद्या सब आई’
ह्या चौपाईचा अर्थ असा आहे की व्यक्ति स्वच्छ मनानी आपल्या गुरूच्या शरण मध्ये जात आहे, व अल्प काळात सर्व विद्या प्राप्त करीत आहे. ह्या चौपाई मध्ये गुरुचा महिमा वर्णन केलेला आहे. ह्या चौपाईचा जाप केल्यास विद्या प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात व आपल्याला यश मिळते.
राम चरित मानस मध्ये ह्या चौपाई बद्दल सांगितले आहे की श्री राम स्वच्छ मनानी गुरु वशिष्ठ ह्यांच्या कडे विद्या घेण्यासाठी गेले व ह्या चौपाईच्या प्रतापा मुळे त्यांना अगदी अल्प काळात सर्व विद्या प्राप्त झाली.
मुलांनो आपण अभ्यासात खूप मेहनत घेत आहात त्याच बरोबर थोडासा वेळ मंत्र जाप केला तर त्याचा आपल्याला लॉन्गटर्म मध्ये सुद्धा खूप उपयोग होतो.
जय श्री राम जय जय राम