सोप्पी झटपट टोमॅटो चटणी इडली-डोसासाठी एक महिना स्टोर करू शकता
Simple Zatpat Tomato Chutney For Idli Dosa, Store For One Month In Marathi
चटणी हा पदार्थ महाराष्ट्रमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपण विविध प्रकारच्या चटण्या बनवतो त्यामुळे आपल्या जेवणाला चव सुद्धा येते. तसेच चटण्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहेत.
आज आपण टोमॅटो चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. टोमॅटो चटणी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. टोमॅटो चटणी चवीला छान आंबट-गोड-तिखट अशी लागते त्यामुळे तोंडाला छान चव येते.
The Simple Zatpat Tomato Chutney For Idli Dosa, Store For One Month in Marathi be seen on our You tube Chanel Simple Zatpat Tomato Chutney For Idli Dosa, Store For One Month
टोमॅटो चटणी आपण जेवताना घेऊन शकतो किंवा इडली-डोसा-उत्तपा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच ती आपण फ्रीजमध्ये एक महिन्या पर्यन्त स्टोर सुद्धा करून वापरू शकतो.
साहित्य:
250 ग्राम टोमॅटो
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
2-3 हिरव्या मिरच्या (चिरून)
4 लसूण पाकळ्या (चिरून)
1/2” आले तुकडा (चिरून)
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने पावडर
2 टे स्पून गूळ (चिरून)
1 टी स्पून व्हाईट व्हेनिगर
मीठ चवीने
कृती: प्रथम टोमॅटो धुवून घ्या. मग एक भांड्यात पाणी घेऊन 3-4 मिनिट उकडून घ्या. मग थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या. कांदा, लसूण व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या. एका वाटीमध्ये हळद, लाल मिरची पावडर व धने पावडर मिक्स करून 1 टे स्पून पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.
एक पॅनमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे व हिंग घाला. मग त्यामध्ये चिरलेला कांदा 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, आता आल-लसूण घालून 1 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये लाल मिरचीची बनवलेली पेस्ट घालून एक मिनिट गरम करून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो पयूरी घालून मिक्स करून मंद विस्तवावर 5 मिनिट शिजवून घ्या, म्हणजे पाण्याचा अंश कमी होऊन चटणी थोडी घट्ट होईल.
मग झाकण काढून त्यामध्ये मीठ, गूळ व 1 टे स्पून तेल घालून मिक्स करून परत 2 मिनिट शिजवून घ्या. शेवटी त्यामध्ये व्हाइट व्हेनिगर घालून मिक्स करून मग विस्तव बंद करा. थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा व पाहिजे तेव्हा काढून सर्व्ह करा.