ह्या भाजीच्या समोर पनीर टिक्का मसाला अगदी फिका पडेल करून पहा चाटून खातील
Tasty Besan Gatta Curry Gravy Different Style New Recipe In Marathi
आपण बेसन गट्टेची करी बनवतो पण आज आपण हीच करी खूप निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अश्या प्रकारची करी बनवून बघा पनीर मसाला विसरून जाल.
The Tasty Besan Gatta Curry Gravy Different Style New in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Besan Gatta Curry Gravy Different Style New
बेसनची ही ग्रेव्ही बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी असून खूप स्वादिष्ट लागते. कधी घरात भाजी नसेल तर आपण झटपट अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारची भाजी बनवा सगळे आवडीने खातील. तसेच ही भाजी खूप छान खमंग लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणांसाठी
साहित्य:
1 कप बेसन
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
4 टे स्पून तेल
मसालाकरिता:
1 टे स्पून तेल
3 मध्यम आकाराचे कांदे
6-7 लसूण पाकळ्या
‘1” आले
2 हिरव्या मिरच्या
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती: प्रथम कांदा, टोमॅटो चिरून घ्या. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून थोडेसे पाणी घालून आपण जशी चपातीसाठी कणिक मळतो तसे मळून घेऊन त्याला तेल लावून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे एका प्लेट मध्ये घालून बाजूला 15 मिनिट ठेवा. आता एका कढईमध्ये 2-3 टे स्पून तेल घेऊन त्यामध्ये छोटे पिठाचे गोळे घालून छान तळून घेऊन मग बाजूला ठेवा.
त्याच पॅन मध्ये एक टे स्पून तेल घालून त्यामध्ये चिरलेला कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची घालून 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून 1 मिनिट परतून घ्या. मग विस्तव बंद करून मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालून चिरलेला कांदा घालून 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालून 2-3 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ घालून एक कप पाणी घालून त्याला उकळी आली की तळलेले छोटे वडे घालून कढईवर झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्या. मग कोथिंबीरने सजवून गरमा गरम भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.