टेस्टि एकदम निराळे इडली सॅंडविच मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी
Tasty Idli Sandwich For Kids Tiffin Different New Recipe In Marathi
आपण नेहमी इडली, डोसा किंवा उत्तपा बनवतो, कधी इडली सांबर तर कधी इडली चटणी. पण आपण कधी इडली सॅंडविच बनवले आहे का? बनवून बघा एकदम निराळी रेसीपी आहे सगळे आवडीने खातील.
आपल्या घरी कधी लहान मुलांची पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल.
The Tasty Idli Sandwich For Kids Tiffin Different New Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Idli Sandwich For Kids Tiffin
इडली सॅंडविच बनवताना आपण इडलीचे पीठ बनवून घ्यायचेमग त्यामध्ये भरण्यासाठी बटाटा भाजी बनवायची मग इडली वाफवून त्याला वरतून फोडणी द्यायची
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
इडली बॅटर
2 टे स्पून तेल मीठ चवीने
सारणासाठी:
3 मध्यम आकाराचे बटाटे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची (कुटून)
कोथिंबीर चिरून
लिंबुरस व मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
1/4 टी स्पून हळद
फोडणी वरतून घालण्यासाठी:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
कडीपत्ता पाने
कृती: इडली पीठ बनवून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. बटाटे उकडून सोलून कुस्करून घेऊन त्याला लिंबुरस व मीठ लावून घ्या.
सारणाची भाजी कशी बनवायची: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व चिरलेला कांदा घालून परतून त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून परतून त्यामध्ये हळद व कुस्करलेले बटाटे घालून मिक्स करून कोथिंबीर घाला व मिक्स करून घ्या. आता भाजी तयार झाली आहे.
इडली पात्रामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवा. इडली स्टँडला तेल लावून त्यामध्ये थोडे थोडे इडली पीठ घालून बटाट्याच्या भाजीचा एक छोटा चपटा गोळा ठेवून त्यावर परत थोडे इडली पीठ घालून इडली स्टँड इडली पात्रामध्ये ठेवा. मग झाकण लाऊन 12 मिनिट इडली वाफवून घ्या. मग 12 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून इडली बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्या.
फोडणीच्या वाटीमध्ये 2 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी-जिरे-हिंग घालून कडीपत्ता घालून विस्तव बंद करा मग फोडणी थंड झाल्यावर फोडणीचे चमच्यानी इडलीवर घाला.
आता आपले इडली सॅंडविच तयार आहे सर्व्ह करू शकता.