टेस्टि शाम सवेरा डिश एकदम निराळी सगळे आवडीने खातील
Tasty Shaam Savera Dish Bhaji Ekdam Different Recipe In Marathi
शाम सवेरा ही अगदी निराळी डिश आहे, ती हेल्दी तर आहेच तसेच दिसायल आकर्षक आहे व टेस्टि सुद्धा आहे. शाम सेवेरा डिश बनवताना पनीर वापरले आहे तसेच पालक सुद्धा वापरले आहे. त्यामुळे ती हेल्दी आहे.
The Tasty Shaam Savera Dish Bhaji Ekdam Different Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Shaam Savera Dish Bhaji Ekdam Different Recipe
शाम सवेरा डिशची ग्रेव्ही खूप टेस्टि लागते. बनवायला सोपी आहे तसेच झटपट सुद्धा होणारी आहे सगळे अगदी आवडीने खातील.
शाम सवेरा कोफता करी बनवताना कोफ्टे पनीरचे बनवून त्यावर पालकचे मिश्रण बनवून ते लाऊन त्याला तळून घेतले आहे. मग त्याचे दोन भाग करून घेतले त्यामुळे आतून पांढरा रंग व बाहेरून हिरवा रंग असे सुंदर दिसते. ग्रेव्ही बनवताना कांदा, आले-लसूण-टोमॅटो व फ्रेश क्रीम वापरले आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
100 ग्राम पनीर
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/2 टी स्पून मिरे पावडर
1/2 वाटी पालक पयूरी
1 टी स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 टे स्पून बेसन
1/4 कप ब्रेडक्रम
मीठ चवीने
1/4 वाटी तेल तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी मसाला:
3 मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
3 मध्यम आकाराचे टोमॅटो (उकडून)
7-8 लसूण पाकळ्या
1” आले
2 हिरव्या मिरच्या
7-8 काजू
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
जायपत्री थोडीशी
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून काश्मिरी मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
2 टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कृती: पालक शिजवून चाळणीवर निथळत ठेवून, मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, आल-लसूण घालून ब्लेंड करून घ्या. मग एका बाऊलमध्ये पालक पेस्ट काढून त्यामध्ये 2 टे स्पून बेसन व बब्रेडचा चुरा घालून मीठ घालून मिक्स करून 10 मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे एक सारखे 6-7 गोळे बनवून घ्या.
पनीर किसून घेऊन त्यामध्ये वेलची पावडर व मिरे पावडर घालून मळून घेऊन त्याचे छोटे छोटे 6-7 गोळे बनवून घ्या. एक पनीरचा गोळा घ्या व एक पालकचा गोळा घ्या. मग पालकचा गोळा हातात घेऊन त्याला वाटी सारखा आकार द्या व त्यामध्ये एक पनीरचा गोळा ठेवून पालकच्या गोळ्यांनी बंद करून घ्या.
एका कढई मध्ये 1/2 वाटी तेल घेऊन गरम करून सर्व गोळे तळून घ्या. पॅन जास्त ब्राऊन होई पर्यन्त तळायचे नाही. तळून झाले की एका प्लेटमध्ये काढून ठेवा. मग त्याचे दोन भाग करा. दोन भाग केले की बाहेरून हिरवा व आतून पंधरा रंग दिसेल खूप मस्त दिसेल.
ग्रेव्ही मसाला करिता: कांदे चिरून घ्या, टोमॅटो उकडून साले काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून बाजूला ठेवा.
एका कढईमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, आल-लसूण-हिरवी मिरची 3-4 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये काजू घालून परत गरम करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
त्याच कढई मध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे व जायपत्री घालून वाटलेला कांदा मसाला घालून तेल5-7 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो पयूरी घालून 4-5 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ चवीने घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये 3/4 कप पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून झाकण काढून त्यामध्ये 1/4 क फ्रेश क्रीम घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
आता एका मोठ्या आकाराच्या प्लेट मध्ये ग्रेव्ही काढून घ्या व त्या ग्रेव्ही मध्ये सर्व कट केलेले गोळे ठेवा व वरतून फ्रेश क्रीमने सजवून गरम गरम चपाती किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.