24 मार्च 2024 होळी मुहूर्त, पूजाविधी कापूरचे 4 उपाय व पहा त्याचे फायदे
24 March Holika Dahan Muhurat, Puja Vidhi W 4 Upay W Fayde In Marathi
24 मार्च ह्या दिवशी होळी आहे व 25 मार्च ह्या दिवशी रंगाचा सण धूलिवंदन आहे. धार्मिक मान्यता अनुसार होळीच्या दिवशी वाईट गोष्टी वाईट विचार मनातून काढून चांगल्या गोष्टी आचरणात आणायच्या. होळीच्या दिवशी कापुराचे काही उपाय केलेतर आर्थिक तंगी पासून छुटकारा मिळून आपल्या जीवनातील नाकारात्मकता निघून जाईल.
The 24 March 2024 Holika Dahan Muhurat, Puja Vidhi W4 Upay V Fayde in Marathi be seen on our You tube Chanel 24 March 2024 Holika Dahan
चला तर मग पाहूया कापूरचे कोणते 4 उपाय आहेत:
1. कापूर व लवंगचा उपाय:
आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा वाढत चालली आहे तर त्यापासून छुटकारा मिळण्यासाठी होळीच्या दिवशी एका मातीच्या पणतीमध्ये विषम संख्या मध्ये कापूर घ्या, म्हणजे 3, 5, 7 असे. जितके कापूर घेणार तेव्हडयाच संख्याचे लवंग घ्या. मग ते जाळून घरातील प्रतेक कोनामध्ये फिरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ति निघून जाईल व सकारात्मक ऊर्जाचा संचार येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय सूर्यास्त होण्याच्या अगोदर करावा.
2. आंब्याच्या झाडाची डहाळी किंवा लाकूड व कापूरने करा हवन:
होळीच्या दिवशी सकाळी हवन करण्याचा वेळी त्यामध्ये आंब्याच्या झाडांची फांदी व कापूर वापरा त्यामुळे पती-पत्नी मधील संबंध मजबूत बनतील घरातील तनाव दूर होईल.
3. तुपामध्ये भिजवलेला कापूर जाळा:
आपल्या घरात नेहमी सुख-शांती व समृद्धी पाहिजे असेलतर होळीच्या दिवशी तुपामध्ये कापूर डुबवून मग जळावा व त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. त्यामुळे आपल्याला फायदा होईल व आपले नाते संबंध सुद्धा घट्ट होतील.
4. कापूर बरोबर गुलाबाच्या पाकळ्या जाळा:
जर आपण आर्थिक तंगी पासून परेशान आहात किंवा आपल्या घरात बरेच दिवसा पासून समस्या आहेत व त्यापासून छुटकारा मिळण्यासाठी होळीच्या दिवशी रात्री गुलाबाच्या पाकळ्या कापुर सोबत जाळा. मग त्याची राख होळी जळताना त्यामध्ये विसर्जित करा असे केल्याने आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील.
होळी दहन पूजाविधी शुभ मुहूर्त:
24 मार्च 2024 रविवार रात्री 11:13 ते रात्री 12:07 मिनिट
सर्वार्थ सिद्धि योग – 24 मार्च 2024, सकाळी 07.34 – 25 मार्च 2024, सकाळी 06.19
रवि योग – सकाळी 06.20 – सकाळी 07.34
होळी पूजाविधी:
होळी पूजनच्या वेळी भगवान नृसिंह मग प्रहलाद ह्याचे ध्यान करून प्रणाम करा मग चंदन अक्षता व फूल अर्पित करून नमस्कार करा. मग होळीची पूजा कारा. पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. पूजा मध्ये शक्य असेलतर 7 प्रकारचे पकवान ठेवा. ह्या दिवशी होळीचे दर्शन अगदी आवर्जून केले पाहिजे. त्यामुळे मनातील नकारात्मकता निघून जाईल व दैवी शक्ति प्राप्त होईल.
Disclaimer: ह्या लेखात दिलेली माहिती आम्ही फक्त आपल्या जाणकारीसाठी दिली आहे त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.