25 मार्च 2024 होळीच्या दिवशी पहिले चंद्रग्रहण, नकारात्मक ऊर्जा पासून वाचण्यासाठी करा उपाय
25 March 2024 Chandra Grahan Satik Upay To Remove Negative Energy In Marathi
चंद्र ग्रहणचा धार्मिक व वैज्ञानिक दृष्टीने वेगवेगळे महत्व असते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर ग्रहण लागणे ही एक सामान्य भौगोलिक घटना आहे. पण ज्योतिष शास्त्रा नुसार ग्रहण ही घटना अशुभ मानली जाते.
The 25 March 2024 Chandra Grahan Satik Upay For Remove Negative Energy in Marathi be seen on our You tube Chanel 25 March 2024 Chandra Grahan Satik Upay
25 मार्च 2024 सोमवार ह्या दिवशी चंद्रग्रहण आहे. संयोगानी ह्याच दिवशी होळी सुद्धा आहे. असे म्हणतात की पूर्णिमाच्या रात्री राहू केतू चंद्राला गिळून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून ग्रहण लागते. असे सुद्धा म्हणतात की चंद्र ग्रहण ह्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्ति ह्या पावरफुल होतात. त्यासाठी त्या नकारात्मक शक्ति पासून वाचण्यासाठी काही सटीक सोपे उपाय केले पाहिजे.
पंचांगा नुसार 25 मार्च 2024 सोमावर ह्या दिवशी चंद्र ग्रहण आहे.
चंद्र ग्रहण सोमवार सकाळी 10:23 मिनिट नी सुरू होत असून
दुपारी 3:02 मिनिटांनी समाप्त होत आहे.
चंद्र ग्रहणच्या वाईट प्रभावा पासून वाचण्यासाठी करा काही उपाय:
होळीच्या दिवशी ह्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव भरतामध्ये होणार नाही. पण ज्योतिष
शास्त्रानुसार चंद्रग्रहण चांगले म्हणजे शुभ मानले जात नाही. त्यासाठी काही उपाय आपण करायला पाहिजे.
चंद्रग्रहणचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून चंद्रग्रहण सुरू झालेकी गुरुमंत्र जाप सुरू केला पाहिजे. गुरु मंत्र जाप केल्यास आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्याच बरोबर महामृत्युंजय मंत्र जाप सुद्धा करावा.
बीज मंत्र:
“ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:’
चंद्रग्रहण सुरू झालेकी तोंडात तुळशीचे पान ठेवावे. त्यामुळे व्यक्ति वर ग्रहणाचा दुष्प्रभाव पडत नाही.
चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदर व चंद्रग्रहण संपल्यावर स्नान जरूर करायला पाहिजे.
चंद्र ग्रहण समाप्त झाल्यावर घरात गंगाजल शिंपडले पाहिजे त्यामुळे शुद्धीकरण होईल.
चंद्र ग्रहण संपल्यावर दान-धर्म करायला पाहिजे. त्यामुळे व्यक्तिवर त्याचा दुष्प्रभाव पडणार नाही.
गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.