8 मार्च शुक्रवार महाशिवरात्री 2024 तिथी, शुभ मुहूर्त व पूजाविधी इन मराठी
8 March Mahashivratri 2024 Sampurn Mahiti W Mantra In Marathi
पूर्वीच्या काळी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव ही विवाह बंधनात बांधले गेले होते. प्रतेक वर्षाच्या फाल्गुन महिन्यातील चतुर्थी ह्या तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. ही दिवशी व्रत ठेवल्यास विवाहित जोडप्यांना सुख व सौभाग्य प्राप्त होते तसेच अविवाहित असाल तर विवाह लवकर होण्याचे योग येतात.
The 8 March Mahashivratri 2024 Sampurn Mahiti W Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Mahashivratri Sampurn Mahiti W Mantra
8 मार्च शुक्रवार 2024 ह्या दिवशी कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या तिथीला महाशिवरात्री साजरी करायची आहे. महाशिवरात्री ह्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवतात. त्यामुळे घरात सुख समृद्धी व आनंद येतो. पान पूर्ण श्रद्धा पूर्वक पूजा अर्चा केली पाहिजे.
शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार फाल्गुन महिन्यातील कृश पक्ष चतुर्थी तिथी 8 मार्च संध्याकाळी 9 वाजून 57 मिनिट ला सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 9 मार्च संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिट ला समाप्त होत आहे. प्रदोष काळात भगवान शिव व माता पार्वती ह्यांची पूजा करतात त्यामुळे 8 मार्च ला महाशिवरात्री साजरी करायची आहे.
पूजा विधी वेळ:
महाशिवरात्री पूजा विधी वेळ संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिट पासून 9 वाजून 28 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळेत यथासांग माता पार्वती व भगवान शिव ह्यांची पूजा करावी.
पूजा विधि:
महाशिवरात्री ह्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून आपली नित्य कार्य करून गंगाजल टाकलेल्या पाण्यानि आंघोळ करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. मग सूर्य देवाला जल अर्पण करावे. आपल्या घरातील पूजा घरात चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालून त्यावर माता पार्वती व भगवान शिव ह्यांची प्रतिमा स्थापित करावी. मग कच्चे दूध व गंगाजल हयानी अभिषेक करा.
मग पंचोपचार करून विधी पूर्वक भगवान शिव व माता पार्वती ह्यांची पूजा करा. भगवान शिव ह्यांना धतुराचे फूल, फळ, फूल, बेलपत्र व नेवेद्य अर्पित करून मंत्र जाप करावा. मग आरती करून सुख समृद्धी व शांती मिळण्यासाठी प्रार्थना करून संपूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करावी. मग आरती करून फलाहार करावा. रात्री भगवान शिव ह्याची भजन म्हणावी. मग दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा करून मग उपवास सोडावा. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी.
मंत्र जाप करावा:
धार्मिक मान्यत अनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र जाप केल्याने चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व जीवनात सुख-समृद्धी येते.
महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
शिव पंचाक्षरी मंत्र:
ॐ शिवाय नम:
शिवजीचा रुद्र मंत्र:
ॐ नमो भगवते रुद्राय नमः
शिवजी का गायत्री मंत्र:
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥
डिसक्लेमर: ह्या लेखात जी माहिती दिली आहे ती फक्त आपल्या माहिती करिता दिली आहे त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.