अंडी व बेसनची अशी लाजवाब निराळी रेसिपी पाहून चिकन मटन विसरून जाल
Andi W Besan Chi Lajawab Recipe Chicken Mutton Visrun Jhal Recipe In Marathi
आपण ह्या अगोदर अंड्याच्या रेसिपी बऱ्याच पाहिल्या. आज आपण बेसन व अंडी वापरुन एक मस्त रेसिपी बनवणार आहोत. बेसन व अंडी वापरुन बनवलेली रेसिपी आपण करून पहा खूप निराळी आहे. तसेच बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
The Andi W Besan Chi Lajawab Recipe Chicken Mutton Visrun Jhal in Marathi be seen on our You tube Chanel Andi W Besan Chi Lajawab Recipe Chicken Mutton Visrun Jhal
आपण पाटवडीचे कालवण बनवतो त्या सारखी आहे पण त्यामध्ये आपण अंडी वापरणार आहोत. ह्या रेसिपी मध्ये कांदे बारीक चिरून घेतले आहेत जर आपण निम्मे कांदे बारीक चिरून घेतले व निम्मे कांदे वाटून घेतले तरी मस्त ग्रेव्ही बनते.
घरात भाजी नाही तर अश्या प्रकारची रेसिपी बनवू शकता. प्रतेक वेळी चिकन किंवा मटणाची ग्रेव्ही बनवायला पाहिजे असे नाही.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 अंडी
1/2 कप बेसन
1 छोटासा कांदा (बारीक चिरून)
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
2 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
ग्रेव्ही साठी:
साहित्य
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा कांदा (ब्लेंड करून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून दही
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून कसूरी मेथी
1 दालचीनी तुकडा
2 हिरवी वेलची
1 लाल सुकी मिरची
कृती: प्रथम कांदा व कोथिंबीर चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या.
एका बाउल मध्ये बेसन व अंडी फेटून घ्या. मग त्यामध्ये कांदा, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट वाटले तर 1-2 टे स्पून पाणी घालून बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा, त्यावर थोडे तेल घालून 1-1 टे स्पून मिश्रण घेऊन पॅनमध्ये भजा सारखे घाला. एका वेळेस 5-6 छोटी छोटी भजी घाला. 2 मिनिट झाल्यावर उलट करून परत 2 मिनिट शालो फ्राय करा. अश्या प्रकारे सर्व भजी बनवून बाजूला काढून ठेवा.
दुसऱ्या विस्तवावर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम झाले की त्यामध्ये जिरे, कसूरी मेथी, दालचीनी, हिरवे वेलदोडे व लाल सुकी मिरची घालून मग चिरलेला कांदा 2-3 मिनिट परतून घ्या. कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये कांद्याची पेस्ट व आल-लसूण पेस्ट घालून ती पण 2 मिनिट परतून घ्या, आता चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या, मग दही, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला पावडर व मीठ घालून 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये 1 1/2 कप पाणी किंवा आवश्यकता नुसार पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिट ग्रेव्ही शिजवून घ्या.
आता त्यामध्ये बेसन व अंडी घालून बनवलेली भजी घालून मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिट गरम करून घेऊन लगेच चपाती बरोबर सर्व्ह करा. नाहीतर बेसन ग्रेव्ही मधील पाणी शोषून घेईल.