पुरण मिक्सरमध्ये वाटून पोळी व पुरण यंत्रामध्ये वाटून पोळी
Authentic Shahi Puran Poli How To Grind Puran In Mixer Recipe In Marathi
पुराण पोळी म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वीट डिश, पुरण पोळी ची तुलना कशाशी होऊ शकत नाही. पुरणपोळी ही खूप पौस्टिक सुद्धा आहे. होळी म्हणा किंवा पडवा, किंवा कोणता सुद्धा सण म्हणा आपण बरेच वेळा पुरणपोळीचे ताट बनवतो.
The Authentic Shahi Puran Poli How To Grind Puran In Mixer in Marathi be seen on our You tube Chanel Authentic Shahi Puran Poli How To Grind Puran In Mixer
पुरणपोळी म्हंटले की डोळ्यासमोर छान मस्त मऊ लुसलुशीत वरतून तुपाची धार सोडलेली अशी दिसते. पुरणपोळी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. पुरण पोळी बनवताना आपल्याला पुरण वाटण्यासाठी पुरण यंत्र पाहिजे किंवा पाटा वरवंटा पाहिजे कारणकी त्याच्या मुळे पुरण छान वाटले जाते. पण प्रतेक जणा कडे ह्या गोष्टी असतील असे नाही.
आपण पुरण मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. आम्ही ह्या अगोदरच्या आर्टिकल किंवा विडियो मध्ये पुरण न वाटता तसेच गव्हाचे पीठ किंवा मैदा न वापरता पुरण पोळी कशी बनवायची ते पहिले त्याची लिंक पुढे देत आहे. पुरण न वाटता पुरण पोळी
आज आपण ह्या आर्टिकल किंवा विडियो मध्ये पुरण मिक्सरमध्ये वाटून पुरणपोळी कशी बनवायची व पुरण पुरण यंत्रामध्ये वाटून पुरण पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 7 पुरण पोळ्या बनतात
साहित्य:
पुरणकरिता:
1 कप चनाडाळ
3/4 कप गूळ
2 टे स्पून साखर
1/4 कप खवा
2 टे स्पून काजू-बदाम पावडर
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
एक चिमुट मीठ
आवरणकरिता:
1 1/4 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून मैदा
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
तूप पुरण पोळीला लावायला
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये किंवा परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ मिक्स करून घेऊन हळू हळू पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्या, मग तेल घालून परत चांगले पीठ मळून झाकून बाजूला ठेवा, तोपर्यंत आपण पुरण कसे बनवायचे ते पाहू या.
पुरण बनवण्यासाठी:
प्रथम चनाडाळ धुवून घ्या. मग कुकरमद्धे चनाडाळ च्या तिप्पट पाणी घालून कुकरचे झाकण लाऊन मध्यम विस्तवावर 5-6 शिट्या काढून घ्या. एक स्टीलचे भाडे व त्यावर चाळणी ठेवा. कुकर थंड झाल्यावर शिजलेली चनाडाळ व पाणी चाळणीवर काढून घ्या. डाळ चाळणीवर राहून पाणी खालच्या भांड्यात जास्तीचे पाणी येईल त्याला कट असे म्हणतात. कटाची छान चमचमीत आमटी बनवतात.
मग चाळणीवरील डाळी मधले संपूर्ण पाणी निथळले की मिक्सरच्या भांड्यात चनाडाळ घेऊन मस्त बारीक ब्लेंड करून घ्या.
नॉनस्टिक पॅनमध्ये वाटलेली डाळ घेऊन त्यामध्ये चिरलेला गूळ व साखर घालून मिक्स करून मंद विस्तवावर मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. पुरण चांगले झाले का ही पाहण्यासाठी उलथणे मधोमध उभे करावे ते पडता कामा नये मग पुरण तयार झाले असे समजावे. मग त्यामध्ये किसलेला खवा, काजू-बदाम पावडर, वेलची पावडर, जायफळ पूड घालून मिक्स करून थोडे गरम करून घ्या. मग विस्तव बंद करून पुरण थंड होऊ द्या.
पुरणपोळी कशी बनवायची:
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. गव्हाचे पीठ जे मळलेले आहे त्याचे एक सारखे 7-8 गोळे बनवून घ्या. पुरणाचे सुद्धा एक सारखे 7-8 गोळे बनवून घ्या. मग एक गोळा घेऊन त्याला पीठ लाऊन पुरी सारखा लाटून घ्या. मग त्यावर एक पुरणाचा गोळा ठेऊन पुरी मुडपून गोळा बंद करून घ्या व हातांनी थोडा दाबून त्याला पीठ लाऊन हलक्या हातानी लाटून घ्या.
तवा गरम झालकी त्यावर लाटलेली पोळी घालून विस्तव मध्यम आचेवर ठेवा. पोळी थोडी फुगली की उलट करा. पोळी उलट केल्यावर जरा फुगली की उलथनाने हळुवार पणे कडा शेकून घ्या. पुरणपोळी छान भाजून झाली की वरतून तूप किवा तेल लावून परत थोडी भाजून घ्या.
आता खमंग गरमा गरम शाही पुरणपोळी तुपाची धार सोडून कटाच्या आमटी बरोबर सर्व्ह करा.