होळी स्पेशल पुरण न वाटता, पीठ व मैदा न वापरता पुरणपोळी व कटाची आमटी भरपूर टिप्स सोबत
Holi Special Puran Poli No Grinding No Atta Or Maida With Tips Recipe In Marathi
होळी हा सण संपूर्ण भारतात धूम धडाक्यात साजरा करतात. होळी म्हंटले की पुरण पोळी ही हवीच. महाराष्ट्रात पुरण पोळी ही होळीला नेवेद्य साठी बनवतात. होळीच्या दिवशी पुरणपोळी चे खूप महत्व आहे. आपल्याला जर शाही पुरणपोळी बनवायची असेलतर त्याची टेक्स्ट लिंक पुढे दिलेली आहे: शाही पुरणपोळी
आपण आज पुरणपोळी बनवणार आहोत पण त्याचे विशेष महत्व आहे ते म्हणजे पुरणपोळीचे पुरण न वाटता व गव्हाचे पीठ किंवा मैदा न वापरता आपण बनवणार आहोत. आपण आवरणासाठी रवा वापरणार आहोत.
पुरण बनवताना आपल्याकडे पुरण वाटण्यासाठी पुरण यंत्र असते किंवा आपण पाट्यावर सुद्धा पुरण वाटतो. पण आपण एक पेला किंवा वाटी किंवा पावभाजी बनवतात जे मॅशर वापरतो ते वापरणार आहोत.
The Holi Special Puran Poli No Grinding No Atta Or Maida With Tips in Marathi be seen on our You tube Chanel Holi Special Puran Poli No Grinding No Atta Or Maida With Tips
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 7 पुरणपोळ्या बनतात.
साहित्य:
पुरण बनवण्यासाठी:
1 कप चनाडाळ
3/4 कप गूळ (किंवा निम्मा गूळ, निम्मी साखर)
एक चिमुट हळद
एक चिमुट मीठ
1 टी स्पून वेलची पावडर
थोडेसे जायफळ
आवरणासाठी:
1 1 /4 कप बारीक रवा
1 टे स्पून तेलाचे मोहन
मीठ चवीने
1/2 कप दूध पीठ भिजवण्यासाठी
1/4 टी स्पून हळद
तांदळाचे पीठ पोळी लाटण्यासाठी
तूप पोळीला लावण्यासाठी
कृती: पुरण कसे बनवायचे: प्रथम चनाडाळ स्वच्छ धुवून एक तास पाण्यात भिजत ठेवा म्हणजे डाळ छान भिजते व लवकर शिजते. मग कुकर मध्ये डाळ ठेवून डाळीच्या तिप्पट पाणी घालून त्यामध्ये मीठ व हळद घालून मिक्स करून कुकरचे झाकण लाऊन 5 शिट्या काढा. मग झाकण काढून बाजूला ठेवा. एक भांडे व त्यावर चाळणी ठेऊन डाळ चाळणीवर काढून घ्या, पाणी निथळून भांड्यात येईल त्याला कट असे म्हणतात त्या कटा पासून आपण कटाची आमटी अगदी स्वादिष्ट बनवून शकतो.
आता डाळ एका परातीत काढून घेऊन मॅशरने किंवा पेला किंवा वाटीने चांगली मॅश करा. मग एका नॉनस्टिक पॅन मध्ये मॅश केलेली डाळ काढून घ्या, त्यामध्ये गूळ घाला, गूळ घालताना अगदी बारीक चिरून घ्या म्हणजे लगेच विरघलेल व आपला वेळ सुद्धा वाचेल, पुरण घट्ट व्हायला आले की त्यामध्ये वेलची पावडर व जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्या. पूर्ण घट्ट झाले कसे समजावे तर पुरणाच्या मधोमध झारा उभा करा, झारा पडला नाही पाहिजे म्हणजे समजावे पुरण तयार झाले. आपण डाळ चांगली मॅश करून घेतली होती त्यामुळे पुरण वाटायची गरज नाही.
आवरणासाठी किंवा पारीसाठी: आपण आवरणासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा वापरणार नाही तर आपण बारीक ‘0’ चा रवा वापरणार आहोत. जर आपल्या कडे 0 रवा नसेलतर आपल्या कडील रवा मिक्सरमधून काढून घेवू शकता.
एका बाउलमध्ये रवा, मीठ, हळद तेलाचे कडकडीत मोहन व दूध लागेल तसे वापरुन पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा सैल मळायचे नाही. मग त्याला तेलाचा हात लाऊन एक तास झाकून बाजूला ठेवा. म्हणजे रवा छान भिजेल. एका तासानी पीठ परत चांगले मळून घ्या. मग त्याचे एक सारखे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या.
एक पिठाचा गोळा घेऊन तांदळाची पीठ लाऊन पुरी सारखा लाटून त्यामध्ये अर्धा कपाला थोडे कमी पुरण भरून पुरी मुडपून गोळा बंद करून घ्या. मग तांदळाचे पीठ लाऊन पोळी लाटून घ्या.
तवा गरम करायला ठेवा, तवा एकदम खूप तापलेला नसावा नाहीतर पोळी तव्यावर टाकल्या टाकल्या तव्याला चिटकून करपून जाईल, तसेच पोळी टाकल्या टाकल्या लगेच उलटू नका नाहीतर ती पूर्ण फुगणार नाही. पोळी उलट केली की उलथन्यानि पोळीच्या कडा हळुवार पणे दाबून पोळी फुलवून घ्या. पोळी छान भाजली गेली की खाली उतरून पेपरवर काढून ठेवा म्हणजे त्यामधील वाफ निघून जाईल.
पोळी भाजताना आपण वरतून तेल किंवा तूप लावू शकतो त्यामुळे खमंग सुद्धा लागते किंवा पोळी खाली उतरवून वरतून तूप लावावे अशी पोळी सुद्धा छान लागते. अश्या प्रकारे सर्व पुरण पोळ्या बनवून घ्या.
कटाची आमटी:
साहित्य:
2 कप कट
1 टे स्पून तेल
3-4 लसूण ठेचून
1/4 टी स्पून हिंग
खडा मसाला
(2 लवंग,4-5 मिरे, 1/2” दालचीनी, 1 टी स्पून जिरे, तमालपत्र)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हळद
2 टे स्पून वाटलेले पुरण
मीठ चवीने
1 आमसुल
कोथिंबीर चिरून
कृती: एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिंग, खडा मसाला, घालून थोडेसे गरम करून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ व कट घालून मिक्स करून वाटलेले पुराण घालून मिक्स करून घ्या.
आता आमटीला उकळी येऊ द्या. मग आमसुल व कोथिंबीर घालून उकळी आली की विस्तव बंद करा.
गरम गरम पुरणपोळी व कटाची आमटी सर्व्ह करा.