15 मिनिटांत स्वादिष्ट कलाकंद पाहून सगळे होतील थक्क
In 15 Minutes Delicious Zatpat Bread Kalakand Halwai Style Recipe In Marathi
कलाकंद ही मिठाई सर्वाना आवडते. कलाकंद हा दुधा पासून बनवला जातो त्यामुळे त्याची किमत सुद्धा जास्त असते. तसेच बनवायला सुद्धा वेळ लागतो.
आज आपण कलाकंद अगदी सोप्या पद्धतीने पहाणार आहोत फक्त 15 मिनिटांत अगदी हलवाईच्या दुकाना सारखा टेस्टि व सुंदर. त्यासाठी फक्त एक मस्त ट्रिक आहे. जर तुम्ही ह्या ट्रिकनी कलाकंद बनवला तर अगदी स्वस्त व मस्त बनवू शकता.
The In 15 Minutes Delicious Zatpat Bread Kalakand Halwai Style in Marathi be seen on our You tube Chanel Delicious Zatpat Bread Kalakand Halwai Style
कलाकंद बनवायचा असेलतर आपल्याला 2-3 लीटर दूध लागते. व बराच वेळ आटवत बसावे लागते. पण आता तसे नाही करावे लागणार.
बनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनिट
वाढणी: 250 ग्राम
साहित्य:
500 मिलि लीटर दूध
4 ब्रेड स्लाइस
1/2 वाटी साखर
केसर
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: प्रथम दूध आटवायला ठेवा. दूध आटून निम्मे झालेकी की मग त्यामध्ये साखर, केसर व वेलची पावडर घालून मिक्स करून त्यामधील अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवा. मग परत रबडी होई पर्यन्त आटवून घ्या.
ब्रेडच्या कडा कापून घ्या. ब्रेडच्या कडा आपल्याला कटलेट बनवण्यासाठी उपयोगी पडू शकतात म्हणून त्या फ्रीजमध्ये ठेवा.
एक चौकोनी ट्रे घेऊन ट्रेच्या मापाचे ब्रेड कट करून घ्या. ट्रेमध्ये थोडीशी रबडी घालून पसरवून घ्या. मग त्यावर ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर बाजूला काढून ठेवलेले थोडे दूध घालून थोडी रबडी घालून पसरवून घ्या. मग त्यावर अजून एक ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर राहिलेले दूध घालून रबडी पसरवून घ्या. मग वरतून ड्रायफ्रूटने सजवून 2 तास फ्रीजमध्ये झाकून सेट करायला ठेवा.
थंड झाल्यावर सेट होईल मग कापून सर्व्ह करा. सगळे म्हणतील अरे वा मस्त आहे.