2 मिनिटांत चटपटी स्वादिष्ट पेरूची चटणी सोपी पद्धत
In 2 Minutes Swadisht Guava Chutney | Peru Chi Chutney Recipe In Marathi
आपण बाजारात गेलो व आपल्याला पेरू देसले तर आपण पटकन खरेदी करतो. आता पेरूचा सीझन चालू आहे त्यामुळे आपल्याला ते सहज उपलब्ध होतात.
पेरू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पेरू सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पेरूमद्धे विटामीन A व C आहे त्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहते, मानसिक ताण कमी होऊन आरामदायी, चिंता मुक्त वाटते, आपली स्कीन व केसांसाठी फायदेमंद आहे, अतिसारचा त्रास असेल तर थांबतो, कोलेस्ट्रॉल कमी होते. असा गुणकारी पेरू आहे. त्यामुळे त्याचे नियमित सेवन करावे.
The In 2 Minutes Swadisht Guava Chutney | Peru Chi Chutney in Marathi be seen on our You tube Chanel Guava Chutney | Peru Chi Chutney
आता आपण पाहू या पेरूची चटपटी चटणी कशी बनवायची
बनवण्यासाठी वेळ: 2 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 मध्यम आकाराचा फ्रेश पेरू किंवा 1 कप पेरूचे तुकडे)
1/4 कप कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
1” आले
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून काळ मीठ
1/4 टी स्पून मिरे पावडर
एक चुटकी हिंग
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
कृती: प्रथम पेरू व कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या, पेरूच्या बिया काढून चिरून घ्या.
आले व हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
मिक्सरच्या जार मध्ये चिरलेले पेरू, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, धने-जिरे पावडर, काळी मिरी पावडर, काळे मीठ, हिंग व मीठ चवीने घालून 2 टे स्पून पाणी घालून ब्लेंड करून घ्या. मग एका बाउलमध्ये काढून घ्या.
चटपटी पेरूची चटणी सर्व्ह करा.