सर्व कार्य सिद्धी गणेश मंत्र प्रतेक कामात मिळेल सफलता
Sarv Karya Siddhi Shri Ganesh Mantra In Marathi
आज आपण सर्व कार्यात सिद्धी प्राप्त होण्यासाठी श्री गणेश मंत्र च्या बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच पुढे दिलेल्या मंत्राचा उपयोग करून आपल्या जीवनातील कामामधील येणाऱ्या अडचणी कश्या दूर करायच्या ते पाहू या.
The Sarv Karya Siddhi Shri Ganesh Mantra in Marathi be seen on our You tube Chanel Sarv Karya Siddhi Shri Ganesh Mantra
श्री गणेशजीनच्या सर्व कार्य सिद्धी मंत्रानचा उपयोग फार पूर्वी पासून केला जात आहे व ह्या मंत्रा मुळे भक्तामध्ये कधी सुद्धा नाराजी येत नाही. आपण कोणते सुद्धा शुभ काम सुरू करणार असाल किंवा कोणत्या सुद्धा कामात अडचणी येत असतील तर पुढे दिलेला मंत्र जाप करा. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊन श्री गणेशजींची कृपा मिळून सफलता मिळेल.
आपल्या सुद्धा कामात अडचणी येत असतील किंवा काम होत असताना परत परत विघ्न येत असतील तर आपण गणेश मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हणा नक्की तुम्हाला चांगला अनुभव येऊन सर्व बाधा दूर होऊन कार्य सिद्धी होईल.
हिंदू धर्मामध्ये गणेश भगवान ह्यांचे महत्व:
हिंदू धर्मामध्ये शिव-पार्वती श्री गणेश विघ्नहर्ता ह्यांचे खूप महत्व आहे. सर्व बाधा व विघ्न नाश करणारे गणेश भगवान ह्यांची मनोभावे पूजा अर्चा व मंत्र जाप केल्यास भक्ताला आशिर्वाद व सफलता मिळते. हिंदू शास्त्रा नुसार बुधवार ह्या दिवशी श्री गणेश भगवान ह्यांची विशेष पूजा केल्यास कृपा प्राप्त होते.
जर कोणाच्या कुंडलीमद्धे बुध ग्रह स्थिति कमजोर आहे तर बुधवार ह्या दिवशी गणेश मंत्र जाप केल्यास बुध ग्रह स्थिति सुधारून प्रगती व उन्नती होते.
चला तर मग पाहूया सर्व कार्य सिद्धी गणेश मंत्राचा उपयोग कसा करायचा:
गणेशजीनच्या ह्या मंत्राला सर्व कार्य सिद्धी मंत्र म्हंटले जाते कारणकी ह्या मंत्राचा जाप केल्याने आपल्या कार्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन सफलता प्राप्त होते. मंत्र छोटा व सरळ आहे त्यामुळे कोणता सुद्धा भक्त मनोभावे ह्या मंत्राचा जाप करून श्री गणेश भगवान ह्यांची कृपा मिळवू शकतो.
सर्व कार्य सिद्धी मंत्र:
॥ ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥
सर्व कार्य सिध्दी मंत्र खूप सोपा आहे त्यामुळे गणेश भक्त कोणत्या सुद्धा नवीन कामाला सुरवात करण्या अगोदर किंवा कोणत्या सुद्धा कामातील बाधा दूर करण्यासाठी ह्या मंत्राचा हवन, पूजा, आरती, साधना केल्यावर म्हणू शकतो. मंत्र म्हणतात पूर्व दिशेला तोंड करून बसावे व 7 किंवा 21 वेळा शांतपणे मंत्र म्हणावा.