Tasty Spicy Different Chicken Keema Balls Curry Tikka Gravy Recipe In Marathi
टेस्टि चमचमीत चिकन खीमा बॉल करी | टिक्की ग्रेव्ही एकदम निराळी कमी तेलात
चिकनच्या आपण बऱ्याच विविध प्रकारच्या डिश बनवतो. तसेच आपण खीमा सुद्धा विवध प्रकारे बनवतो. पण चिकन खीमाचे बॉल किंवा टिकी बनवून त्याची करी बनवली तर खूप टेस्टि लागते.
चिकन खीमा बॉल करी बनवताना प्रथम मस्त पैकी करी बनवून त्यामध्ये खीमा चे बॉल किंवा टिकी बनवून ते करी मध्ये सोडायचे मस्त लागतात. आपण बॉल बनवू शकतो किंवा त्याच्या टिकी सुद्धा बनवू शकतो टिकी बनवली तर तेल सुद्धा कमी लागते व ते झटपट होतात.
The Tasty Spicy Different Chicken Keema Balls Curry Tikka Gravy in Marathi be seen on our You tube Chanel Chicken Keema Balls Curry Tikka Gravy
चिकन खीमा बॉल करी आपण चपाती किंवा ब्रेड व जीरा राइस बरोबर सर्व्ह करू शकतो. घरी कोणी पाहुणे आले तर बनवा सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
चिकन खीमा बॉल
125 ग्राम चिकन खीमा
1/2 कप चनाडाळ
1” आले
10-12 लसूण पाकळ्या
1-2 हिरवी मिरची
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
करीसाठी:
3 मोठे कांदे (सोलून, उकडून)
10-12 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
2 टे स्पून दही
1 मोठा टोमॅटो (उकडून, सोलून चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कृती: चिकन खीमा बॉल किंवा टिक्की:
चनाडाळ पाण्यात 1 तास भिजत ठेवा. चिकन खीमा धुवून, निथळत ठेवा.
कुकरमद्धे चनाडाळ व चिकन खीमा घालून 1/4 कप पाणी घालून मध्यम विस्तवावर 3 शिट्या काढून घ्या. मग कुकर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले चिकन खीम आल-लसूण-हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, गरम मसाला व मीठ घालून ब्लेंड करून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या, तेल गरम झालेकी मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून तळून घ्या, किंवा मिश्रणाच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून नॉन स्टिक पॅन गरम करून शालो फ्राय करून घ्या.
चिकन खीमा बॉल करी किंवा ग्रेव्ही कशी बनवायची:
कांदे सोलून त्याचे चार तुकडे कापून घ्या, आल चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. टोमॅटो पाण्यात घालून 2 मिनिट उकडून त्याची साल काढून मग चिरून बाजूला ठेवा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये कांदे घालून मध्यम विस्तवावर 2-3 मिनिट उकडून घ्या. मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये उकडलेले कांदे, आल-लसूण ब्लेंड करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून ब्लेंड केलेल्या कांदा घालून थोडा कोरडा होई पर्यन्त परतून घ्या, मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ चवीने घालून मिक्स करून दही घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालून 2 मिनिट परतून 1 1/2 कप पाणी घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट मसाला शिजवून घ्या. मसाला शिजला की त्यामध्ये आपल्याला हव्या तेव्हडया चिकन टिक्की किंवा बॉल घालून 2 मिनिट गरम करून घ्या.
आता गरम गरम चिकन खीमा बॉल करी किंवा चिकन टिक्का ग्रेव्ही चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा, सर्व्ह करताना वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.