Tasty Swadisht Kavath Chutney | Wood Apple Chutney Benefits In Marathi
महाशिवरात्री स्पेशल स्वादिष्ट झटपट कवठची चटणी व त्याचे सेवनाचे फायदे काय आहेत
कवठ ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कवठ ही आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होते तसेच ते साधारण पणे 10 ते 12 रुपयाला असते म्हणजे स्वस्त व आरोग्यदायी आहे. कवठ नेहमी पिकलेले सेवन करावे.
The Tasty Swadisht Kavath Chutney | Wood Apple Chutney Benefits in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Swadisht Kavath Chutney | Wood Apple Chutney Benefits
चटणी कशी बनवायची त्याचा शॉर्ट विडियो पुढे क्लिक करून पाहू शकता: कवठ चटणी
कवठ मध्येपोषक तत्व विटामीन C, प्रोटिन , मिनरल, कार्बोहाइड्रेट व फाइबर तसेच आयर्न, कॅल्शियम, जिंक, विटामीन बी 1 व बी 2 आहे.
कवठ मध्ये भरपूर एंटीऑक्सीडेंट आहेत जे शरीरातील टॉकसिन काढण्यास मदत करते. ज्याने आपली स्कीन चांगली राहते. आपले दात व हाडे मजबूत बनतात, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, पोटासाठी गुणकारी आहे, पोट साफ होऊन पोटातील जंत निघून जातात, कावठाच्या सेवणाने भूक लागते, रोग प्रतिकार शक्ति वाढते. कवठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते व कोलेस्ट्रॉल कमी होते.
आता आपण पाहू या कवठ ची चटणी कशी बनवायची:
साहित्य:
1 मोठ्या आकाराचे कवठ
1 कप कवठचा गर
1 कप गूळ चिरून
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
1/2 टी स्पून काळे मीठ
कृती: कवठ फोडून त्यामधील गर काढून घ्या, मग त्याच्या बाजूच्या शिरा काढून टाका, गूळ चिरून घ्या.
एका बाउल मध्ये कवठचा गर घेऊन त्यामध्ये गूळ, लाल मिरची पावडर, मीठ व काळे मीठ घालून मिक्स करून घ्या. मग झाकून 10-15 मिनिट बाजूला ठेवा.
मग सर्व्ह करा, आपण कवठची चटणी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकतो पाहिजे तेव्हा काढून सेवन करून शकतो.
असे हे गुणकारी कवठ आहे त्याची चटणी नक्की बनवून सेवन करा.